IPL 2024 : आययीएलमध्ये प्रेक्षकांचं सर्वात जास्त समर्थन मिळणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स (CSK). चेन्नई सुपर किंग्स कोणत्याही स्टेडिअममध्ये खेळत असली तरी हजारो पाठिराखे तिथे उपस्थित असतात. इतकंच काय तर अनेक फॅन्स आपल्या होम टीमला पाठिंबा देण्याऐवजी चेन्नई सुपर किंग्सला समर्थन करतात. चेन्नईचा संघ होम ग्राऊंडवर खेळत असेल तर प्रेक्षकांचा उत्साह अगदी शइगेला पोहोचलेला असतो. चेन्नई सुपर किंग्सचा संघ जेव्हा एम ए चिदम्बरम स्टेडिअवर (MA Chidambaram Stadium) खेळतो तेव्हा संपूर्ण स्टेडिअम पिवळ्या रंगात न्हाऊन निघालेलं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई वि. कोलकाता सामन्यातही वेगळं चित्र नव्हतं. चिदम्बरम स्टेडिअमवर चेन्नईला पाठिंबा देण्यासाठी हजारो समर्थक उपस्थित होते. पण या सामन्याआधी कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) एका चाहत्याने एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय, ज्यावरुन एम ए चिदम्बरम स्टेडिअम प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. 


कोलकाताच्या चाहत्यांचा गंभीर आरोप
चेन्नई-कोलकाता सामन्याआधी कोलकाता नाईट रायडर्सच्या एका चाहत्यांने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत चिदम्बरम स्टेडिअमबाहेर केकेआरच्या चाहत्यांना अडवलं जात असताना दिसतंय. चाहत्यांच्या हातातले केकेआरला समर्थन करणारे होर्डिंग आणि फ्लॅग काढून घेतले जात होते. केकेआरच्या चाहत्यांना बॅनर्स, प्लेकार्ड किंवा फ्लॅग स्टेडिअममध्ये घेऊन जाण्यापासून रोखलं जात होतं. स्टेडिअमच्या सुरक्षा रक्षकांकडून हे सर्व साहित्य काढून घेतलं जात असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. 


पण दुसरीकडे चेन्नई सुपर किंगसच्या पाठिराख्यांना असे कोणतेही निर्बंध नव्हते. सीएसकेचे फॅन्स चेन्नईला समर्थन करणारे प्लेकार्ड, बॅनर्स, फ्लॅग असं साहित्य घेऊन सरळ स्टेडिअममध्ये प्रवेश करताना दिसत होते. पण सुरक्षा रक्षकांकडून त्यांची कोठेही अडवणूक केली जात नव्हती. खरच असा प्रकार घडत असेल तर एम ए चिदम्बरम स्टेडिअममध्ये खेळणाऱ्या इतर संघांवर हा अन्याय असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. असे प्रकार होत असतील तर बीसीसीआयने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणीही चाहत्यांकडून केली जात आहे.



चेन्नईची आयपीएलमधली कामगिरी
आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात चेन्नईच्या याच एम ए चिदम्बरम स्टेडिअमवर झाली होती. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात सलामीचा संघात सलामीचा सामना रंगला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने आरसीबीचा पराभव करत विजयी सलामी दिली. चेन्नई सुपर किंग्सने तब्बल पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे.