444 रन, 12 विकेट्स पण त्याच्या फिल्डींगने मॅचचा निकाल फिरला! `हा` Video बघाच
IPL 2024 DC vs GT Stunning Filding Video: अत्यंत रंजक सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने गुजरातवर निसटता विजय मिळवला. या सामन्यामध्ये 444 धावा कुटण्यात आल्या. मात्र सामन्यातील निर्णायक क्षण हा 19 व्या ओव्हरमधील दुसरा बॉल ठरला असं म्हटलं जातंय.
IPL 2024 DC vs GT Stunning Filding Video: इंडियन प्रिमिअर लीगच्या 40 व्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अतिशय रंजक सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाचा अवघ्या 4 धावांनी पराभव केला. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून एकूण 444 धावा काढल्या. दिल्लीच्या संघाने दिलेलं 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाला 220 धावापर्यंतच मजल मारता आली आणि अवघ्या 4 धावांनी त्यांनी सामना गमावला. मात्र या सामन्याचा निकाल गोलंदाजी आणि फलंदाजीबरोबरच एका अप्रतिम कामगिरीमुळे फिरल्याची चर्चा आहे. ही कामगिरी केली ती दक्षिण आफ्रिकेच्या ट्रिस्टन स्टब्सने!
6 ऐवजी मिळाली एकच धाव
ट्रिस्टन स्टब्सने केलेल्या अप्रतिम फिल्डींगमुळे दिल्लीच्या संघाला एका षटकार रोखता आला आणि त्या बॉलवर गुजरातने केवळ 1 धाव घेतली. हाच फरक नंतर सामन्याचा निकाल लावणारा ठरला, कारण गुजरातच्या 20 ओव्हर संपल्या तेव्हा त्यांच्याकडे विकेट्स बाकी होत्या तरी धावसंख्या 220 पर्यंतच गेली. सामन्याचा निकाल पालटणाऱ्या या निर्णयाक क्षणी नेमकं घडलं काय ते पाहूयात..
नेमकं घडलं काय?
19 व्या ओव्हरमध्ये राशीक गोलंदाजी करत होता. शेवटच्या 12 बॉलमध्ये गुजरातला विजयासाठी 36 धावांची गरज होती. ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर राशीद खानने लेग साईडला चौकार लगावल्याने 11 बॉलमध्ये 32 धावा असं समीकरण झालं. त्यानंतर पुढल्याच बॉलवर राशीदने षटकार लगावण्याचा प्रयत्न केला. त्याने सरळ समोरच्या बाजूला उत्तुंग फटका मारला. हा बॉल आता थेट सीमेपार पडणार असं वाटत असतानाच सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या ट्रिस्टन स्टब्सने अचूक वेळी उडी घेत हा झेल घेतला. मात्र आपण सीमारेषेचा स्पर्श करु असं वाटल्याने स्टब्सने बॉल परत मैदानात फेकला आणि तो बॉण्ड्री लाइनवर पडला. मात्र त्याने वेळीच बॉल हातून सोडल्याने पाच रन वाचवण्यात त्याला यश आलं. स्टब्सची ही फिल्डींग पाहून राशीदही क्षणभर थक्क झालं. त्यानंतरच्या 10 बॉलमध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी झाल्या आणि दिल्लीने हा सामना अवघ्या 4 धावांनी जिंकला. म्हणजेच स्टब्सने सामन्याच्या शेवटून 11 व्या चेंडूवरील तो षटकार आडवला नसता तर सामन्याचा निकाल नक्कीच वेगळा लागू शकला असता.
नक्की पाहा >> MI ची बस अडकली! 'हमारा कॅप्टन कैसा हो..'ची घोषणाबाजी झाली, नंतर रोहितने काय केलं पाहा
चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
सध्या स्टब्सच्या या फिल्डींगसाठी सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
1)
नक्की वाचा >> 'मी नॅशनल टीममध्ये नसलो तरी..'; 19 बॉलमध्ये 88 रन्सच्या खेळीपेक्षा भारी वाक्य! चाहते क्लीन बोल्ड
2)
फलंदाजीमध्येही दाखवली चमक
स्टब्सने केवळ फिल्डींगमधूनच नाही तर फलंदाजीमध्येही चमक दाखवली. सामन्यामध्ये पहिल्या डावात शेवटून दुसऱ्या षटकामध्ये स्टब्सने तुफान फटकेबाजी करत तब्बल 20 हून अधिक धावा काढल्या. यामध्ये त्याने 2 षटकार आणि 2 चौकार लगावले. स्टब्सने 7 बॉलमध्ये नाबाद 26 धावांची खेळी केली. यात 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.