IPL 2024 LSG vs DC Playing 11 Prediction : इंडियन प्रीमिर लीग अर्थात आयपीएलमध्येच्या सतराव्या हंगामात आज सव्वीसावा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आमने सामने आहेत. लखनऊच्या इकाना स्टेडिअममध्ये संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी आतापर्यंत चांगली झाली आहे. लखनऊने चारपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. आणि सहा पॉईंटसह लखनऊ तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक झाली आहे. दिल्लीने पाचपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. अपघातानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) तब्बल चौदा महिन्यांनी मैदानावर परतलाय. पण त्याचा संघ मात्र विजयाच्या रुळावर आलेला नाही. हातात आलेले विजय दिल्लीने गमावले आहेत. आता प्ले ऑफच्या शर्यतीत टिकायचं असेल तर दिल्लीला पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. केवळ विजयच नाही तर नेट रनरेटही चांगला ठेवण्याचं आव्हानही दिल्ली समोर असणार आहे. 


लखनऊसमोर दिल्ली विजयाच्या शोधात
लखनऊ सुपर जायंटसचा हा तिसरा आयपीएल हंगाम आहे. 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाची एन्ट्री झाली. लखनऊ आणि दिल्लीत आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. पण दिल्लीला एकही विजय मिळवता आलेला नाही. आता ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली हा इतिहास बदलण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 


दिल्ली संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाय रिचर्डसन, एनरिक नॉर्किया, ईशांत शर्मा, खलील अहमद/कुमार कुशाग्र (इम्पॅक्ट प्लेयर).


लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
क्विंटन डिकॉक, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस/मनीमारण सिद्धार्थ (इम्पॅक्ट प्लेयर), निकोलस पूरन, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन उल हक आणि मयंक यादव.


आयपीएल पॉईंटटेबल


आतापर्यंत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. तर कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या आणि लखनऊ सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांनी चारपैकी तीन सामन्यात विजय मिळवलेत. पण नेट रनरेटच्या जोरावर कोलकाता वरच्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघाने पाचपैकी तीन सामन्यात विजय मिळवलाय. चेन्नई चौथ्या तर हैदराबाद पाचव्या क्रमांकावर आहे.