T20 World Cup : ऋषभ पंतचं होणार टीम इंडियामध्ये कमबॅक? बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट
Sourav Ganguly On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ऋषभ पंतला संधी मिळेल की नाही? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर आता सौरव गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.
Sourav Ganguly On Rishabh Pant : दोन वर्षांपूर्वी ऋषभ पंतचा दिल्लीहून रुरकीला जाताना कार अपघात झाला होता. या घटनेनंतर ऋषभ पंत आयपीएलच्या मागील हंगामात खेळू शकला नव्हता. मात्र, आता तो पुन्हा एकदा ॲक्शनमोडमध्ये परतला आहे. या आयपीएलमध्ये ऋषभ पंत खेळण्याची शक्यता नव्हती. खेळला तरी केवळ फलंदाज म्हणून मैदानात उतरला असं सांगितले जात होतं. मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने याला पूर्णपणे हिरवा कंदील दिल्यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) नेतृत्व करताना दिसतोय.
अपघातानंतरच्या पहिल्या सामन्यात ऋषभने 13 बॉलमध्ये 18 धावांची खेळी केली. मात्र, एका बॉलवर चुकीचा शॉट खेळल्याने ऋषभला विकेट गमवावी लागली. त्यानंतर पुढच्याच सामन्यात ऋषभने झुंजार अर्धशतक देखील ठोकलंय. आता ऋषभ टीम इंडियामध्ये येण्यासाठी उत्सुक दिसतोय. मात्र, ऋषभ टीम इंडियामध्ये कमबॅक कधी करणार? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्सचे डायरेक्टर सौरव गांगुलीने (Sourav Ganguly On Rishabh Pant ) ऋषभवर मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला सौरव गांगुली?
ऋषभ पंतने टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळावं का? असा सवाल जेव्हा सौरव गांगुलीला विचारला गेला, तेव्हा गांगुलीने रोखठोक उत्तर दिलं. पंतने आणखी काही सामने खेळणे महत्त्वाचे आहे जेणेकरून त्याला स्पर्धात्मक क्रिकेटशी जुळवून घेण्याची अधिक संधी मिळेल, असं गांगुली म्हणतो. ऋषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचं देखील गांगुलीने सांगितलं. तो नक्कीच चांगली कामगिरी करतोय, पण त्याला आणखी काही सामने खेळण्याची परवानगी द्यावी लागेल. जर नॅशनल सिलेक्टर्सला त्याची निवड करायची असेल तर येत्या आठवड्यात त्यावर काही बोलू शकेल, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघ - डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (C), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, रसिक दार सलाम, एनरिक नोर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, यश धुल, कुलदीप यादव, रिकी भुई, झ्ये रिचर्डसन, शाई होप, ललित यादव, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा.