Mumbai Indians paid 100 crore For Pandya : यंदाच्या आयपीएल ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मोठा डाव खेळला आहे. पाच वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) 15 कोटी रुपयांच्या करार करत ताफ्यात घेतलं. त्याचबरोबर रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेत पांड्याला संघाचा नवा म्होरक्या केलंय. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे फॅन्स देखील नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे. अशातच आता एका मीडिया रिपोर्ट्सनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. हार्दिक पांड्यासाठी मुंबई इंडियन्सला 15 नाही तर ट्रान्सफर फीसह एकूण 100 मोजावे लागल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.  (Mumbai Indians Paid 100 Crore For Hardik Pandya)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टमध्ये काय लिहिलंय?


अहमदाबाद फ्रँचायझी MI पेक्षा खूप वेगळी आहे. दोघांची संस्कृती आणि ध्येये वेगळी आहेत. MI ही एक व्यावसायिक कुटुंबाद्वारे चालवली जाणारी फ्रँचायझी आहे, तर CVC ही 40 व्यवस्थापकीय भागीदार आणि 29 स्थानिक कार्यालयांचे जागतिक नेटवर्क असलेली गुंतवणूक फर्म आहे. हार्दिक पांड्याला ट्रेड करून GT ची पर्स 15 कोटींनी वाढली. पण त्यांना ट्रान्सफर फी देखील मिळाली. याची माहिती आयपीएलला देखील आहे. मात्र, या रकमेबद्दल अटकळ लगावल्या जातायेत. मात्र, हा आकडा 100 कोटी असल्याची चर्चा आहे, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता चर्चेला देखील उधाण आलंय.


वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या जखमी (Hardik Pandya Injury) झाला अन् त्याला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं. हार्दिक पांड्या जखमी असल्यामुळे त्याला साऊथ अफ्रिका आणि त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेला मुकावं लागलं होतं. अशातच आता तो अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल का? असा सवाल विचारला जात आहे.


मुंबई इंडियन्स : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव , टीम डेव्हिड , विष्णू विनोद.


नवे खेळाडू : जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.