Hardik Pandya : आयपीएल 2024 ला सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत, त्यामूळे साऱ्या टीम्सचे खेळाडू आपआपल्या टीमसोबत जोडले जात आहे. आयपीएलचा 17 वा सिझन हा 22 मार्चपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नईविरूद्ध बॅंगलोर या सामन्याने सुरू होणार आहे. तर मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पांड्याच्या हाती सोपवण्यात आलेली आहे.  हार्दिकने मागील दोन वर्ष गुजरात टायटन्सटचे प्रतिनिधीत्व केले होते, पण या वर्षी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून 15 कोटीमध्ये ट्रेड केले होते.


मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये हार्दिकची अनोखी एन्ट्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याने नुकताच मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत जोडला गेला आहे. त्याने टीमच्या कॅम्पमध्ये एन्ट्री करताच मुंबईचे हेड कोच मार्क बाउचर यांनी हार्दिकला घट्ट मिठी मारत त्याचे स्वागत केले आहे. यानंतर हार्दिकने सर्वात आधी देवाचे आशिर्वाद घेतले यासोबतच मुंबईचे हेड कोच मार्क बाउचर यांनीदेखील देवासमोर नारळ फोडत त्यांच्या पाया पडले.



2 वर्षानंतर हार्दिक पांड्या परतणार मुंबई इंडियन्समध्ये


हार्दिक पांड्या याने मुंबई इंडियन्ससोबतच आपलं IPL करिअर सुरू केलं होतं. 2015 मध्ये हार्दिकने IPL मध्ये पदार्पण केले होते. पण 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी हार्दिक पांड्या हा गुजरात टायटन्स मध्ये सामील झाला होता. हार्दिक हा दोन वर्षांनंतर पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये परतलेला आहे. मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स कडून हार्दिक पांड्याला 15 करोडमध्ये ट्रेड केलं आहे.


हार्दिक पांड्याच्या हाती कॅप्टन्सीची धुरा


गुजरात टायटन्सने 2022 च्या आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि हार्दिक पांड्या याने गुजरातच्या कॅप्टन्सीची धूरा आपल्या हाती घेतली होती. पहिल्यांदाच कॅप्टन्सी करत असलेल्या हार्दिकने गुजरात टायटन्सला आपली पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकवत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते, तर 2023 मध्ये हार्दिक आयपीएल ट्रॉफीपासून फक्त एक पाऊल दूर राहिला होता. आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या चेन्नई सूपर किंग्सने गुजरात टायटन्सला अटीतटीच्या सामन्यात मात दिली होती. मात्र यावर्षी हार्दिक पांड्या हा एका नव्या रूपात दिसणार आहे, तो यावर्षी मुंबई इंडियन्सच्या कपड्यांमध्ये मुंबईची कॅप्टन्सी करताना दिसणार आहे. मात्र हार्दिक मुंबईच्या टीमला सहावी ट्रॉफी जिंकवून देणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.