Ishan Sharma Unplayable Yorker To Andre Russell: इंडियन प्रिमिअर लिगच्या 16 व्या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाचा कोलकात्याने 106 धावांनी पराभव केला. कोलकात्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही उत्तम कामगिरी करत हा सामना सहज जिंकला. या सामन्यामध्ये पहिल्या डावात चौकार षटकारांचा पाऊस पडला. त्यातही कोलकात्याकडून खेळाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या आंद्रे रस्सेलने तुफान फटकेबाजी केली. रस्सेलने 19 बॉलमध्ये 41 धावा केल्या. सामना रंगात आलेला असताना रस्सेल अधिक तुफान फलंदाजी करणार असं वाटतं होतं. मात्र त्याला रोखण्यासाठी कर्णधार ऋषभ पंतने भारताचा अनुभवी क्रिकेटपटू ईशान शर्माच्या हातात चेंडू दिला आणि ईशानने इतका भन्नाट यॉर्कर टाकला की इतर गोलंदाजांना थेट बॉण्ड्रीबाहेर पाठवणाऱ्या रस्सेलच्या पायाजवळू जात बॉलने स्टम्पचा वेध घेतला आणि रस्सेलने पिचवरच साष्टांग लोटांगण घातलं.


फलंदाजानेही टाळ्या वाजवून केलं कौतुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 बॉलमध्ये 41 धावांवर खेळणारा रस्सेल शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजी करताना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणार आणि हैदरादाबच्या संघाने काही दिवसांपूर्वीच केलेला सर्वोच्च धावसंख्येचा म्हणजेच 277 धावांचा विक्रम मोडला जाणार असं वाटत होतं. मात्र ईशान शर्माने शेवटच्या ओव्हरचा पहिलाच चेंडू ईशानने इतका अप्रतिम टाकला की त्याचं उत्तर रस्सेलकडे नव्हतं. ईशानचा यॉर्कर थेट मीडल आणि लेग स्टम्पच्या तळाशी जाऊन धडकला. काही कळण्याआधीच रस्सेल जमीनीवर पडला होता. ईशानने रस्सेलचा काटा काढण्यासाठी टाकलेला बॉल इतका सुंदर होता की स्वत:ची विकेट गेल्यानंतरही रस्सेल या चेंडूच्या प्रेमात पडला. रस्सेलने मैदान सोडताना टाळ्या वाजवून इशानचं कौतुक केलं.


ईशानच्या या चेंडूचं वर्णन बॉल ऑफ दिस आयपीएल असं केलं जात आहे. तुम्हीच पाहा ईशानचा हा भन्नाट यॉर्कर...



कोलकात्याची तुफान फटकेबाजी


कोलकात्याच्या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुनील नरेन, अंग्रकिश रघुवंशी, आंद्रे रस्सेल या तिघांनी केलेल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने तब्बल 272 धावांपर्यंत मजल मारली. नरेनने 39 बॉलमध्ये 85 धावा केल्या. अंग्रकिशने 27 बॉलमध्ये 52 धावा केल्या. रस्सेलने 19 बॉलमध्ये 41 धावा केल्या. दिल्लीचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. कोलकात्याच्या फलंदाजांनी 18 षटकार आणि 22 चौकार लगावले.  7 गड्यांच्या मोबदल्यात 226.67 च्या सरासरीने आयपीएलमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या गाठली. काही दिवसांपूर्वीच सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मुंबईविरुद्ध 277 धावा केल्या होत्या. हा विक्रम शेवटच्या षटकामध्ये कोलकात्याला जास्त धावा न करता आल्याने अबाधित राहिला. 


नक्की पाहा >> Video: पंतने मारलेला No Look Six पाहून शाहरुख खानही खुर्चीवरुन उभा राहिला अन्...


दिल्लीचे प्रयत्न अपयशी


273 धावांचे लक्ष समोर असताना फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीच्या पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नरने तशी बरी सुरुवात केली. मात्र दुसरी ओव्हर संपण्याआधीच शॉ तंबूत परतला. त्यानंतर तिसरी ओव्हर संपण्याआधी मिचेल मार्शच्या रुपात दुसरी विकेट पडली. चौथ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पोरेल तंबूत परतला. संघाची धावसंख्या 33 वर असताना वॉर्नर बाद झाला. पंत आणि स्टब्सने वेगाने धावा करत पुन्हा दिल्लीच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र संघावर रनरेटचा दबाव कामय असल्याने मोठे फटके मारण्याच्या नादात पंत 13 व्या ओव्हरला संघाची धावसंख्या 126 असताना तंबूत परतल्या. अक्सर पटेल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर 159 धावांवर स्टब्सच्या रुपात सातवी विकेट पडली. त्यानंतर धावसंख्येत 7 धावांची भर घालत तळाचे 3 गडी तंबूत परतले. दिल्लीच्या संघाला पूर्ण 20 ओव्हरही खेळून काढता आल्या नाहीत. कोलकात्याने हा सामना 106 धावांनी जिंकला. आम्ही सामन्याच्या सुरुवातीपासूनच नियोजनानुसार खेळलो नाही असं पंत म्हणाला.