IPL 2024 मध्ये `कुलचा`ची कमाल, घेतल्या 25 विकेट... टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी?
IPL 2024 : कुलचा जोडी म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या दोघांनी आतापर्यंत तब्बल 25 विकेट घेतल्या आहेत.
Kuldeep Yadav And Yuzvendra Chahal: आयपीएल 2024 भारतीय खेळाडूंसाठी विशेष महत्त्वाची आहे. आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर बीसीसीआय निवड समिती (BCCI Selection Committee) जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघ (Team India) निवडणार आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय खेळाडूच्या कामगिरीवर निवड समितीचं बारकाईने लक्ष आहे. अशात कोणत्या खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळते याकडे संपूर्ण भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. भारतीय क्रिकेटमधली कुलचा अर्थात कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या जोडीला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळेल अशी शक्यता आहे.
आयपीएलमध्ये 'कुलचा'ची कमाल
आयपीएलच्या यंदाच्या हंगमात राजस्थान रॉयल्सकडून खेळतावा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चायनामॅन कुलदीप यादव यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. हे दोन्ही फिरकी गोलंदाज पर्रपल कॅपच्या शर्यतीतही आघाडीवर आहेत. दोघांनी मिळून तब्बल 25 विकेट घेतल्या आहेत. युजवेंद्र चहलने 8 सामन्यात 20.38 च्या अॅव्हरेजने 13 विकेट घेतल्या आहेत. तर कुलदीप यादवने 6 सामन्यात 15.08 च्या अॅव्हरेजने आतापर्यंत 12 विकेट घेतल्या आहेत.
यंदाच्या आयपीएलमधील त्यांची कामगिरी पाहता टी20 वर्ल्ड कपसाठी चहल आणि कुलदीपची टीम इंडियातली कामगिरी जवळपास निश्चित मानली जातेय.
चहल टीम इंडियातून बाहेर
युजवेंद्र चहल गेला बराच काळ भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. चहल टीम इंडियासाटी शेवटचा टी20 आंतरराष्ट्रायी सामना ऑगस्ट 2023 मध्ये खेळला होता. भारतात झालेल्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप संघातही चहलला संधी देण्यात आली नव्हती. पण आता चहलने आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारतीय निवड समितीला चहलच्या नावाचा विचार करावा लागणार आहे.
दुसरीकडे कुलदीप यादव हा भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाजाची भूमिका बजावतोय. 2023 एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येही कुलदीपला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. भारतीय संघ जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शेवटची टी20 मालिका खेळला होता. या मालिकेत कुलदीपने दमदार कामगिरी केली. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमध्ये कुलदीप यादवची जागा जवळपास निश्चित आहे.
भारतीय संघाची निवड
आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे 4 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. यंदा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी येत्या 1 मे पर्यंत सहभागी देशांना आपाल संघ जाहीर करायचा आहे. त्यामुळे बीसीसीआयदेखील येत्या चार ते पाच दिवसात टीम इंडियाची घोषणा करेल. टी20 वर्ल्ड कप साठी 15 खेळाडूंच्या संघाची निवड केली जाणार आहे.