MS Dhoni Retirement from IPL: इंडियन प्रीमिअर लीगच्या 61 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने  (CSK) राजस्थान रॉयल्सचा (RR) पाच विकेटने पराभव केला. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर खेळवण्यात आला. पण या सामन्यात असं काही घडलं की ज्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चाहत्यांना निराश व्हावं लागलं. या हंगामात चेन्नईचा घरच्या मैदानावरा हा शेवटचा सामना होता. चेन्नई ग्रुपमधला आपला शेवटचा सामना 18 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत खेळणार आहे. हा सामना बंगळुरुच्या के एम चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्याआधीच फ्रँचाईजीने केलं होतं ट्विट
चेन्नई वि. राजस्थान सामन्यानंतर एक अशी घटना घडली, ज्यामुळे 42 वर्षांच्या धोनीच्या आयपीएलमधून निवृत्तीची चर्चा रंगली आहे. सामन्याआधी CSK फ्रँचाईजीने सोशल मीडियावर ट्विट करत प्रेक्षकांना आवाहन केलं होतं. फ्रँचाईजनीने पोस्ट शेअर केली, ज्यात त्यांनी प्रेक्षकांना सामना संपल्यनंतर स्टेडिअममध्येच थांबवण्याचं आवाहन केलं. सामन्यानंतर चाहत्यांना सरप्राईज मिळणार असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं. या पोस्टमुळे धोनीची निवृत्ती जाहीर होणार असा अंदाज वर्तवण्यात आला. 


धोनीचं 'लॅप ऑफ ऑनर'
चेपॉकवर राजस्थानला हरवल्यानंतर एक वेगळंच दृष्य पाहायला मिळालं. एमएस धोनी आणि संपूर्ण चेन्नई संघाने 'लॅप ऑफ ऑनर' म्हणजे स्टेडिअमला एक राऊंड मारला. धोनीने आपल्या माजी सहकारी सुरेस रैनाबरोबर आपल्या संघाला असचं प्रेम आणि पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आणि चाहत्यांचे आभार मानले.


यादरम्यान चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून धोनीने चेंडूही दिले. लॅप ऑफ ऑनरच्याआधी चेन्नई व्यवस्थापनाने धोनीसह सर्व खेळाडूंना गोल्ड मेडल दिलं. सर्व खेळाडू एका रांगेत उभे राहिले. त्यानंतर संधाचे मालक एन श्रीनिवास यांची मुलगी रुपा गुरुनाथने प्रत्येक खेळाडूच्या गळ्यात गोल्ड मेडल घातले.


धोनीला 'गार्ड ऑफ ऑनर'
यानंतर चेन्नईच्या सर्व खेळाडू आणि स्टाफने एम एस धोनीला गार्ड ऑफ ऑनर दिला. या सर्व सोहळ्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असणार असं शक्यता वर्तवली जात आहे. चेन्नई फ्रँचाईजीने मात्र याबाबत कोणतंही अधिकृत माहिती दिलेली नाही. 


येत्या 7 जुलैला धोनी 43 वर्षांचा होईल. वाढत्या वयामुळे देखील धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरू शकते. आयपीएलच्या सतराव्या हंगामाच्या सुरुवातीलाच धोनी कर्णधारपदावरुनही पायउतार झाला होता. पुढच्या हंगामात म्हणजे आयपीएलच्या अठराव्या हंगामात धोनी नव्या भूमिकेत दिसू शकतो. धोनीकडे मेंटोर किंवा प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्या तरी या सर्व शक्यताच आहेत.