IPL 2024 CSK vs RCB Weather and Pitch Report in Marathi: आजपासून (22 मार्च) इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) 17वा हंगामाच श्री गणेशा होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना हा गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB Vs CSK) यांच्यात एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रात्री 8.00 वाजता सुरु होणार असून या सामन्यात चेन्नईचा संघ आपल्या नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. त्यामुळे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांच्याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि मुंबई हे दोन संघ आपले विजेतेपद राखण्यात यशस्वी ठरले आहेत. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी जेतेपद पटकवल्यानंतर चेन्नईचा संघ पहिल्यांदाच ऋतुराज गायकवाड या नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. धोनीने कर्णधारपदाची माळ ऋतुराजच्या गळात घालण्याचा निर्णय घेतला असला तरी चेन्नईला आता नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.  तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला अद्याप एकदाही जेतेपदावर मोहर उमटवता आली नसली तरी महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील संघाने बंगळुरुला पहिलेवहिले आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले. तसेच चेन्नईने यंदाच्या मोसमात डेव्हॉन कॉनवेच्या जागी न्यृझीवलंडच्या रचिन रवींद्रची नियुक्ती केली. 


अशी असेल खेळपट्टी


एमए चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत 76 आयपीएल सामने खेळण्यात आले होते.  त्यामध्ये ही प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने त्यापैकी 46  सामने जिंकले आहे. जसजसी आयपीएलचे सामने होतील, तसतशी खेळपट्टी जुनी होत जाईल. परिणामी ही खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल आहे आणि येथे 150 ते 180 पर्यंतचा स्कोअर आव्हानात्मक आहे.


पाह आजच्या हवामानाचा अंदाज


22 मार्च रोजी चेन्नईमध्ये अति उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उच्च तापमान 31 अंशांपर्यंत पोहोचेल. तर ते संध्याकाळपर्यंत 40 अंशांसारखे असेल. किमान तापमान 27 अंश राहील, त्यामुळे सायंकाळनंतर खेळाडूंना दिलासा मिळणार नाही.


CSK vs RCB संभाव्य प्लेइंग 11


चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, महेश थेक्षाना.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, आकाश दीप, मोहम्मद सिराज.