IPL 2024, SRH vs KKR : आयपीएलच्या सतराव्या हंगामात कोणता संघ चॅम्पियन ठरणार हे रविवारी म्हणजे 26 मे रोजी ठरणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्या चेन्नईच्या  एमए चिदंबरम् स्टेडिअमवर मेगाफायनल (IPL Final) खेळवली जाणार आहे.  कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा तर सनरायजर्स हैदराबाद दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. पॉईंटटेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर सामन्यात हैदराबादचा 8 विकेटने पराभव करत थेट अंतिम सामन्यात एन्ट्री केली. तर क्वालिफायर 2 मध्ये हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत फायनल गाठली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणता संघ जिंकणार आयपीएल ट्रॉफी?
आयपीएल 2024 ट्ऱॉफी कोलकाता जिंकणार की हैदराबाद बाजी मारणार याकडे करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) आणि इंग्लंडचा दिग्गज फलंदाज केविन पीटरसन यांनी भविष्यवाणी वर्तवली आहे. मॅथ्यू हेडन आणि केविन पीटरसन यांनी कोलकाता नाईट रायडर्स विजेता होईल असं भाकित वर्तवलं आहे. 


कोलकाता नाईट रायडर्सची फिरकी जोडी सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती सामन्यात निर्णायक ठरलीत असं हेडनने म्हटलं आहे. कोलकाच्या या जोडीने यंदाच्या हंगामात तब्बल 36 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय हाय व्होल्टेज सामन्यात अनुभवी संघाला जास्त फायदा मिळतो असंही हेडनने म्हटलं आहे. 


तर केविन पीटरसन यानेही विजेतेपदासाठी कोलकाता नाईट रायडर्सला पहिली पसंती दिली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदाराबादने अंतिम फेरीत धडक मारल्याचा आपल्याला आनंद आहे. पण क्वालिफायर सामन्यात ज्या पद्धतीने कोलकाताविरुद्ध हैदराबादचा पराभव झाला तो आपल्याला आवडला नाही. या पराभवाचं ओझं अंतिम सामन्यात हैदराबाद संघावर असेल. याऊलट कोलकाता संघ मोठ्या आत्मविश्वासाने अंतिम सामन्यात उतरेल. कोलकाता संघाकडे फलंदाजी आणि गोलंदाजीचा उत्तम मेळ आहे. या जोरावर ते सामन्याचा निकाल बदलू शकतात असंही पीटरसनने म्हटलं आहे. 


कोलकाता नाईट रायडर्सचा संघ
सुनील नरेन, अंगकृष रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानुल्लाह गुरबाज, मिशेल स्टार्क,  नितीश राणा, श्रीकर भरत


सनरायजर्स हैदराबादचा संघ
ट्रैविस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिंस (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन , उमरान मलिक, सनवीर सिंह, ग्लेन फिलिप्स, वाशिंगटन सुंदर, जयदेव उनादकट, मयंक अग्रवाल, एडेन मार्कराम, अनमोलप्रीत सिंह, उपेन्द्र यादव, मयंक मार्केंडे