Pat Cummins & Mitchell Starc Price In Auction : आसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता वेध लागले आहेत ते आयपीएलचे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी (IPL 2024) 19 डिसेंबरला मिनी ऑक्शन (Mini Auction) पार पडला. या लिलावात 10 फ्रँचाईजीने 72 खेळाडूंवर तब्बल 230 कोटी रुपये खर्च केले. या वेळच्या लिलाव प्रक्रियेत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं वर्चस्व पाहिला मिळालं. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc), कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विजयी शतक ठोकणाऱ्या ट्रेव्हिस हेडवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार्क-कमिन्सवर 45 कोटी खर्च
मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सला खरेदी करण्यासाठी अक्षरश: चढाओढ पाहिला मिळाली अखेर कोलकाता नाईट रायडर्सने 24 कोटी 75 लाखांची बोलीव लावत स्टार्कला आपल्या संघात घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली ठरली. तर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार पॅट कमिन्सवर सनरायजर्स हैदराबादने तब्बल 20.50 कोटी रुपयांची बोली लावली. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच 20 कोटींचा टप्पा पार झाला. याआधी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करन हा आयपीएलमधला सर्वात महागडा खेळाडू होता. आयपीएल ऑक्शन 2023 मध्ये पंजाब किंग्सने सॅम करनला 18.50 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतलं होतं. 


मिचेल स्टार्कचा प्रत्येक चेंडू 7.40 लाखांना
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मिचेल स्टार्क कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्व सामने खेळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. आयपीएलमध्ये मिचेल स्टार्क ग्रुप स्टेमधले सर्व 14 सामने खेळल्यास प्रत्येक सामन्यात 4 षटकं याप्रमाणे 336 चेंडू टाकेल. प्रत्येक चेंडूचा हिशोब केला तर मिचेल स्टार्कने टाकलेला प्रत्येक चेंडू हा  7.40 लाखांचा असेल. पण कोलकाता नाईट रायडर्स अंतिम सामन्यात पोहोचल्यास मिचेल स्टार्क एकूण 17 सामने खेळेल. म्हणजे तो 408 चेंडू टाकेल. असं झाल्यासत मिचेल स्टार्कने टाकलेला प्रत्येक चेंडू 6.1 लाख रुपयांना असेल. 


पॅट कमिंसचा प्रत्येक चेंडू 6.1 लाखांना
दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादसाठी पॅट कमिन्स ग्रुप स्टेजमधले सर्व 14 सामने खेळला तर प्रत्येकी चार षटकांप्रमाणे तो 336 चेंडू टाकेल. म्हणजेच पॅट कमिन्सने टाकलेला प्रत्येक चेंडूची किंमत 6.1 लाख रुपये इतकी असेल. सनरायजर्स हैदराबाद अंतिम फेरीत पोहोचल्यास पॅट कमिन्स 17 सामने खेळेल. त्याने टाकलेला प्रत्येक चेंडू 5 लाख किंमतीची असेल. 


मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी आयपीएलमध्ये टाकलेला प्रत्येक चेंडू 6 ते 7लाखात असणार.  भारतात एका सामान्य माणसाचा वर्षाचा पगारही तितका नसतो.