IPL 2024 : सर्वाधिक रन्सच्या शर्यतीत विराटच्या पुढे...; कोण ठरणार ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी? पाहा लिस्ट
IPL 2024 Orange and Purple Cap : आयपीएलच्या 17 व्या हंगामात खेळाडूंकडून अनेक विक्रम होत असताना किंवा आधीच्या दिग्गज खेळाडूंचे विक्रम मोडून नवीन विक्रमांची नोंद होत असते.
IPL 2024 Orange and Purple Cap in Marathi : आयपीएलच्या प्रत्येक हंगामाच फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅप मिळवण्यासाठी चढाओढ सुरु असते. आयपीएलमधील खेळाडूंना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप असा अवॉर्ड दिला जातो. सार्वधि धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते.
तर यंदाच्या आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामात आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली 203 धावसंख्यासह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तर 7 विकेट्सह पर्पल कॅपची कमान चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रहमानकडे आहे. याचबरोबर सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत उतरला आहे. पंजाब किंग्जविरुद्ध 9 मार्चला झालेल्या सामन्यात क्लासेनला फार मोठी खेळी खेळता आली नाही, पण त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली आघाडीवर आहे. कोहलीने आतापर्यंत 5 सामन्यात 105.33 च्या सरासरीने आणि 146.30 च्या स्ट्राईक रेटने 316 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या बॅटमधून 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत या खेळांडूचा समावेश
तर ऑरेंज कॅपच्या यादीत विराट कोहलीसह पहिल्या पाच खेळांडूमध्ये रियान पराग 181 धावासंह दुसऱ्या स्थानावर आहे. तर हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेन 167 धावांसह तिसऱ्या क्रमाकांवर आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन आयपीएलमध्ये 146 धावसंख्या करुन या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज क्किटन डी कॉक 139 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीत या खेळांडूचा समावेश
तर आयपीएलच्या पर्पल कॅपसाठी बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझर रहमान पहिल्या स्थानावर आहे, त्याने सीएसकेसाठी तीन सामन्यात सात विकेट्स घेतल्या आहेत. एलएसजीचा वेगवान गोलंदाज मयंक यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत 6 विकेट्सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. जीटीचा गोलंदाज मोहित शर्मा आणि आरआरचा गोलंदाज युजवेंद्र चहल या यादीत प्रत्येकी सहा विकेट्ससह तिसऱ्या आणि चौथ्या स्नावर आहे. त्याचबरोबर दिल्लीचा गोलंदाज खालील अहमद या यादीत 5 विकेट्स पाचव्या स्थानावर आहे. याचबरोबर पंजाब किंग्जचा वेगवान अर्शदिप सिंहने हैदराबादविरुद्धाच्या 4 विकेट्स घेऊन पर्पल कॅपच्या शर्यतीत सहभागी झाला आहे.