Pat cummins replace Aiden Markram : आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर झालंय. आयपीएल तोंडावर असताना आता सनरायझर्स हैदराबादमध्ये (Sunrisers Hyderabad) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सकडे (Pat cummins) नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सध्याचा कॅप्टन ऍडन मार्करम (Aiden Markram) याला नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सनरायझर्स हैदराबाद टीम मॅनेजमेंट कधी निर्णय जाहीर करणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, हैदराबादचे चाहते मालकीण काव्या मारनवर (kavya maran) काहीसे नाराज देखील आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दुबईत झालेल्या खेळाडूंच्या लिलावात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला हैदराबादने 20.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी मोठी बोली ठरली. गेल्या वर्षी पाईंट्स टेबलमध्ये 10 व्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादची डोकेदुखी वाढली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामात हैदराबाद कॅप्टनला डच्चू देण्याची शक्यता होती आणि झालं देखील तसंच... पॅट कमिन्सला संधात घेऊन त्याला कॅप्टन केलं जाईल, असं स्पष्ट चित्र दिसत होतं. 


ऍडन मार्करमच्या नेतृत्वात सनरायझर्सने दक्षिण आफ्रिका टी-ट्वेंटी लीगमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे आता ऍडन मार्करमला पुन्हा आयपीएलमध्ये संधी द्यावी की नाही? असा सवाल हैदराबादच्या मॅनेजमेंटसमोर होता. मात्र, आता पॅटला कॅप्टन करण्याचा निर्णय जवळजवळ निश्चित झाला आहे.


ऍडन मार्करमच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका टी-ट्वेंटी लीगच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने डरबन सुपर जायंट्सचा 89 धावांनी पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला होता. काव्या मारनच्या टीमने सलग दुसऱ्यांदा दक्षिण आफ्रिका टी-ट्वेंटी लीग ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. मात्र, आता ज्या कॅप्टनने दोनदा ट्रॉफी उचलण्याची संधी दिली, त्याच कॅप्टन ऍडन मार्करम डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.


IPL 2024 साठी सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ: 


अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम (C), मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स, जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.