आयपीएल पॉइंट्स टेबल 2024 मुंबई तळाशी! आजच्या सामन्यात थेट 5 व्या स्थानी उडी घेण्याची संधी पण..
IPL 2024 Points Table Updated Team Rankings: मुंबई इंडियन्सच्या संघाचा आज राजस्थान रॉयर्लविरुद्ध (MI vs RR) सामना होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार असून 13 सामन्यानंतर मुंबई हा यंदाच्या आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना न जिंकलेला एकमेव संघ आहे. जाणून घ्या मुंबई vs राजस्थान सामन्यापूर्वी कसा आहे आयपीएल पॉईंट्स टेबल 2024...
IPL 2024 Points Table Latest Team Ranking: : इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वातील 14 वा सामना आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयर्लदरम्यान वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मुंबईचा संघ नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली अजूनही पहिल्या विजयाच्या अपेक्षेत आहे. मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबईला 6 धावांनी पराभूत केलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये हैदराबादच्या संघाने मुंबईला 31 धावांनी धूळ चारली. दुसऱ्या सामन्यात मोठ्या फरकाने पराभव झाल्याने आणि इतर संघांनी किमान आपला एक एक सामना जिंकला असल्याने मुंबईचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी फेकला गेला आहे. आजचा सामना पराभूत झाल्यास मुंबईचा संघ तळालाच राहील. मात्र मोठा विजय मिळवल्यास मुंबईच्या संघाला 5 व्या स्थानी झेप घेऊ शकतो. मात्र यामध्ये एक मोठी समस्या आहे.
अव्वल स्थानी असलेले संघ कोणते?
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला दिल्ली डेअरडेव्हल्सच्या संघाने 20 धावांनी पराभूत केल्याने चेन्नईच्या संघाने पॉइण्ट्स टेबलमधील आपलं पहिलं स्थान गमावलं आहे. आता कोलकात्याचा संघ पहिल्या स्थानी आहे. त्यांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्जचा संघ असून त्यांच्या नावावर एक पराभव आणि 2 विजयांची नोंद आहे. सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये अरपारित राहिलेल्या 2 संघांमध्ये कोलकात्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. पॉइण्ट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थानने आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. चौथ्या स्थानी असलेल्या गुजरातने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आपल्या 3 पैकी 1 सामन्यात मोठा विजय मिळवल्याने ते एक सामना जिंकूनही पाचव्या स्थानी आहे. सहाव्या स्थानी 2 पैकी एक विजय एका पराभवासहीत लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आहे.
तळाचे संघ कोणते?
सातव्या स्थानी स्पर्धेत रविवारी पहिला विजय मिळवणारा ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ आहे. आठव्या स्थानी पंजाब किंग्स इलेव्हनचा संघ असून नवव्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आहे. दोन्ही संघांनी आपआपल्या 3 पैकी 2 सामने गमावेल असून प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. पॉइण्ट्स टेबलमध्ये विजयाच्या कॉलममध्ये आणि पॉइण्ट्सच्या कॉलममधील भोपळा न फोडता आलेला मुंबईचा एकमेव संघ आहे.
...तर राजस्थान नंबर वन
मुंबईच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जात असल्याने सामन्याचं पारडं मुंबईच्या बाजूने झुकलेलं आहे. तरीही राजस्थान रॉयल्सची कामगिरी पाहाता आणि ते या स्पर्धेत अद्याप अपराजित असल्याने त्यांना हरवणं एवढं सोपं जाणार नाही. हार्दिक पंड्या गोलंदाजांचा कसा वापर करुन घेतो यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल. मुंबईची फंलंदाजी उत्तम असली तरी गोलंदाजी चिंतेचा विषय ठरत आहे. राजस्थानने हा सामना मोठ्या फरकाने जिंकल्यास ते पहिल्या स्थानी झेप घेतील. दुसरीकडे मुंबईची गोलंदाजी ही त्यांना मोठा विजय मिळवून देण्यासाठी सक्षम दिसत नाही. त्यामुळेच थेट पाचव्या स्थानी झेप घेण्याची संधी असली तरी मुंबईचे गोलंदाज कशी कामगिरी करतात यावंरच सारं काही अवलंबून असणार आहे.