CSK मध्ये वाद? ऋतुराजला कर्णधार केल्याने जडेजा नाराज? कोच फ्लेमिंग म्हणतो, `ऋतुराज नक्कीच त्याची..`
IPL 2024 Ravindra Jadeja Unhappy With CSK Decision On Captaincy: 2 वर्षांपूर्वी चेन्नईच्या संघाने नेतृत्व बदल केला होता. 2022 मध्ये संघाचं नेतृत्व रविंद्र जडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. जडेजाकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून कर्णधारपद सोपवण्यात आलं मात्र सीएसकेचा हा डाव फसला..
IPL 2024 Ravindra Jadeja Unhappy With CSK Decision On Captaincy: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीगमध्ये विजयासहीत दणक्यात सुरुवात केली आहे. यंदाच्या पर्वामधील पहिल्याच सामन्यात चेन्नईच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघावर विजय मिळवत विजयासहीत स्पर्धेला सुरुवात केली. विशेष म्हणजे चेन्नईचा हा विजय नवा कर्णधार ऋतुराजच्या नेतृत्वाखालील पहिलाच विजय ठरला. चेन्नईला 5 वेळा चषक जिंकून देणारा धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर संघाचा हा पहिलाच सामना त्यांनी 8 बॉल आणि 6 विकेट्स राखून जिंकला. 2 वर्षांपूर्वी चेन्नईच्या संघाने अशाच प्रकारे नेतृत्व बदल केला होता. रविंद्र जडेजाकडे धोनीचा उत्तराधिकारी म्हणून कर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. त्यावेळी निकाल संघाच्या बाजूने लागत नव्हते. याच कारणामुळे आता जडेजाऐवजी ऋतुराजकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. मात्र या निर्णयामुळे जडेजा दुखावल्याची शंका उपस्थित केली जात असतानाच चेन्नईच्या संघाचा प्रशिक्षक असलेल्या स्टीफन फ्लेमिंगने यावर स्पष्टीकरण दिलं आङे.
धोनीने आधी संघाला सांगितला निर्णय
संघाचा कर्णधार बदलल्याने आता रविंद्र जडेजा ऋतुराज गायकवाडला सपोर्ट करेल अशी अपेक्षा फ्लेमिंगला आहे. धोनीने ऋतुराजकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय बऱ्याच विचारानंतर घेतला आहे असं फ्लेमिंगने सांगितलं. संघाबरोबर डिनर टेबलवर बसलेला असताना धोनीने हा निर्णय सर्वांसमोर जाहीर केला. त्यानंतर त्याने याबद्दल संघ व्यवस्थापनाला कळवलं. मात्र या निर्णयाचा जडेजावर काही परिणाम होईल का यासंदर्भात फ्लेमिंग यांनी स्पर्धा सुरु होण्याआधीच स्पष्ट शब्दांमध्ये आपलं मत मांडलं होतं.
जडेजाबद्दल काय म्हणाला फ्लेमिंग
"गेल्या आयपीएलच्या शेवटच्या 2 चेंडूंवर जडेजाने लगावलेल्या दोन शॉट्समुळे तो सीएसकेच्या ऐतिसाहिक कामगिरीचा अविभाज्य भाग झाला आहे. जडेजा हा फार कणखर आहे. तसेच त्याच्याकडे नेतृत्व गुण आहेत. ऋतुराज नक्कीच त्याची मदत घेईल," असं फ्लेमिंगने म्हटलं आहे. ऋतुराजची निवड कर्णधार म्हणून का करण्यात आली याबद्दल बोलताना फ्लेमिंगने, "ऋतुराजमध्ये आत्मविश्वास फार आहे. तो एक आश्वासक चेहरा आहे. तो एका चांगल्या दृष्टीकोनातून संघ सहकाऱ्यांकडे पाहतो. त्याच्याबद्दल संघातील सर्वच सदस्यांना आदर वाटतो," असं सांगितलं.
नक्की पाहा >> क्षणभर विराटलाही विश्वास बसत नव्हता की तो Out झालाय; अजिंक्यने पकडला भन्नाट कॅच, पाहा Video
धोनीवर कौतुकाचा वर्षाव
आयपीएलच्या 2023 च्या पर्वामध्ये शेवटच्या सामन्यात धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र चाहत्यांना आपण पुढील पर्वामध्ये खेळू असा शब्द दिल्याने यंदाच्या पर्वात धोनी खेळत असून हे त्याचं शेवटचं आयपपीएल असेल असं सांगितलं जात आहे. याचसंदर्भात बोलताना फ्लेमिंगने, "शारीरिक दृष्ट्या तो मागील हंगामापेक्षा यंदा अधिक फिट आहे. त्याच्याबद्दलची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याची खेळण्याची इच्छा आणि मैदानात टिकून राहण्याची क्षमता. त्याची कमबॅक करण्याची पद्धत खरोखरच इतरांनाही प्रेरणा देते. त्यातही भर म्हणून त्याच्याकडे असलेलं कौशल्य. तो नेट्समध्ये उत्तम फटकेबाजी करताना दिसतोय," असं सांगितलं.