क्षणभर विराटलाही विश्वास बसत नव्हता की तो Out झालाय; अजिंक्यने पकडला भन्नाट कॅच, पाहा Video

Video IPL 2024 Virat Kohli Catch: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने दमदार सुरुवात केल्यानंतर अचानक आरसीबीची फलंदाजी गडगडली. याच गडबडीमध्ये विराटची विकेट गेली ती एका भन्नाट कॅचमुळे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 23, 2024, 11:42 AM IST
क्षणभर विराटलाही विश्वास बसत नव्हता की तो Out झालाय; अजिंक्यने पकडला भन्नाट कॅच, पाहा Video title=
विराटलाही क्षणभर विश्वास बसत नव्हता

Video IPL 2024 Virat Kohli Catch: इंडियन प्रिमिअर लीगच्या 17 व्या पर्वातील पहिल्याच सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. यंदाच्या आयपीएलमधील हा पहिला सामना चेन्नईमधील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झाला. या सामन्यामध्ये बंगळुरुच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने दमदार सुरुवात केल्याने बंगळुरुचा संघ 200+ धावांचं टार्गेट चेन्नईसमोर ठेवणार असं सुरुवातीच्या काही षटकांमध्ये वाटलं. मात्र अचानक डू प्लेसिस बाद झाला आणि संघाला उतरती कळा लागली. दरम्यान मैदानात सेट झालेला विराट डाव संभाळेल असं वाटत असतानाच एका अप्रतिम कॅचमुळे विराटला तंबूत परतावं लागलं. विशेष म्हणजे बॉण्ड्रीजवळ पकडण्यात आलेला हा कॅच रिले पद्धतची म्हणजेच दोघांनी मिळून पकडला.

41 बिनबादवरुन 42 वर 3 बाद

प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने संघाला 41 धावांची पार्टनरशीप करत दमदार सुरुवात करुन दिली. जवळपास 10 च्या सरासरीने दोघांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी सुरु केली. खास करुन फाफ डू प्लेसिसने गोलंदाजांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्याने 22 बॉलमध्ये 8 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. मात्र मुस्तफिजुर रेहमानच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात ड्यु प्लेसिस झेलबाद झाला. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत विराटने एका धावेची भर घालत स्कोअर 42 वर नेला. मात्र त्याला सोबत करण्यासाठी आलेले रतज पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी स्कोअरबोर्डमध्ये एकाही धावेची भर न परतले. दोघेही शून्यावर बाद झाले. 41 वर बिनबादवरुन बंगळुरुची अवस्था 42 वर 3 बाद अशी झाली. 

विराटलाही विश्वास बसत नव्हता

विराटला साथ देण्यासाठी कॅमरुन ग्रीन फलंदाजीसाठी आला. आता या दोघांवर डावाला आकार देण्याची जबाबदारी होती. मात्र 19 बॉलमध्ये एका षटकारच्या मदतीने 21 धावा केलेल्या असताना मोठा फटका मारण्याच्या नादात विराटने लेग साईडला पूलचा शॉट मारला. मात्र अजिंक्य रहाणेने चपळपणे धावत जात चेंडू पकला. मात्र आपण बॉण्ड्री लाईन ओलांडू असं वाटल्याने झेल पकडल्यानंतर अजिंक्य रहाणेनं जवळच उभ्या असलेल्या रचिन रविंद्रकडे चेंडू फेकला आणि त्यानेही तो अचूक टीपला. रहाणे बॉण्ड्री लाईन क्रॉस करण्याआधीच त्याने बॉल सोडल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट झालं आणि विराटला तंबूत परतावं लागलं. विराटलाही इतकी भन्नाट कॅच पडल्यावर काही क्षण विश्वास बसत नव्हता. विराट क्षणभर शून्यात पाहत जागेवरच उभा होता. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

1)

2)

3)

बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 173 धावा केल्या. 8 चेंडू आणि 6 विकेट्स बाकी असतानाच चेन्नईने हे लक्ष गाठलं आणि या स्पर्धेचा श्रीगणेशा विजयासहीत केला.