विराटला झालंय तरी काय? रजत पाटीदारला दिली शिवी, सिराजला म्हटला वेटर... Video व्हायरल
IPL 2024 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेजर्सचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली आहे. पर्पर कॅपच्या शर्यतीतही तो अव्वल स्थानावर आहे. पण सध्या त्याच्या एका व्हिडिओ खळबळ उडवली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
IPL 2024 Virat Kohli : आयपीएल 2024 चा हंगाम रॉयल चॅलेंजर्ससाठी फारसा चांगला राहिलेला नाही. आयपीएल पॉईंटटेबलमध्ये (IPL Point Table) आरसीबी (RCB) सातव्या क्रमांकावर आहे. पण अजून प्ले ऑफच्या शर्यतीतलं त्यांचं आव्हान कायम आहे. आरसीबीला चांगली कामगिरी करता आलेली नसली तरी आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मात्र यंदा चांगलाच फॉर्मात आहे. यंदाच्या हंगामात विराटच्या बॅटमधून धावांचा ओघ वाहातोय. आरसीबीने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात विराट कोहलीने 542 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही विराट टॉपवर आहे.
विराटचा व्हिडिओ व्हायरल
विराट मैदानावर जितका आक्रमक असतो तितकाच तो मैदानाबाहेरही पाहायला मिळतो. सोशल मीडियावर सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत विराट कोहली आपल्या संघातील खेळाडूंना शिवीगाळ करताना आणि टोमणे मारताना दिसत आहे. या व्हिडिओने एकच खळबळ उडाली आहे. आरसीबीचा फलंदाज रजत पाटीदारला विराटने चक्का शिवी दिलीय. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज तो वेटर बोलताना या व्हिडिओत दिसतोय.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विराट कोहली संघातील आपल्या खेळाडूंबरोबर दिसतोय. वास्तविक हा व्हिडिओ एका जाहीरातीच्या शुटिंग दरम्यानचा आहे. आणि विराट कोहली आपल्या सहखेळाडूंबरोबर मजा-मस्ती करताना दिसतोय. या व्हिडिओत विराट कोहली धमाल मुडमध्ये दिसतोय. यात विराट कोहली आणि दिनेश कार्तिक हातात प्लेट घेऊन उभे असल्याचं दिसंतय. त्याचवेळी तिथे मोहम्मद सिराज हातात आपली प्लेट घेऊन येतो. त्याला पाहून विराट त्याची थट्टा मस्कारी करतो. जरा पोझ दे वेटर सारखा काय उभा आहेस, असं विराटने म्हणताच दिनेश कार्तिकही हसायला लागतो.
तर याच व्हिडिओत रजत पाटीदार हातात रेडिओ घेत खाली बसून पोझ देताना दिसतोय. यावेळी विराट त्याला मस्करीत शिवी देताना दिसतोय. सोशल मीडिआवर आरसीबीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीची बॅट तळपली
यंदाच्या हंगामात विराट कोहलीने दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीने अकरा सामन्यात तब्बल 542 धावा केल्या आहेत. यात त्याने एक शतक आणि 4 अर्धशतकं झळकावलीत. नाबाद 113 ही त्याची यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलनंतर जून महिन्यात टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्याधी विराट कोहलीला गवसलेला फॉर्म संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. विराट कोहलीची टी20 कारकिर्द संपत आली आहे अशी टीका केली जात होती. पण आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करत त्याने टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.