IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगच्या शेवटच्या लीग सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पराभव केला. नुसताच पराभव नाही तर थेट प्ले ऑफचं तिकिटही मिळवलं. लीग मधला हा बंगळुरुचा हा सलग सहावा विजय ठरला. प्ले ऑफमध्ये (IPL Play Off) आरसीबीचा सामना राजस्थान रॉयल्सशी रंगणार आहे. 22 मे रोजी गुवाहाटीमध्ये हा सामना रंगणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगुळुरच्या विजाचा हिरो
18 मे रोजी बंगळुरुचा चेन्नईबरोबर करो या मरोचा सामना होता. बंगळुरुला क्वालिफाय करण्यासाठी अखेरच्या षटकात 17 धावा रोखायच्या होत्या. खेळपट्टीवर फलंदाजीसाठी उभा होता साक्षात एमएस धोनी. बंगळुरुच्या सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत होता. शेवटचं षटक कोण टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशात बंगळुरुचा कर्णधार फाप डू प्लेसीने चेंडू यश दयालच्या हाती सोपवला आणि सर्वांच्यच भूवया उंचावल्या. यशच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने 110 मीटर दूर षटकार खेचला. बंगळुरुच्या खेळाडूंबरोबरच चाहत्यांचाही श्वास रोखला गेला. प्ले ऑफचं गणित बिघडणार असं वाटत असतानाच चमत्कार झाला.


यश दयालने पुढच्याच चेंडूवर महेंद्रसिंग धोनीची विकट घेत नुसतंच कमबॅक केलं नाही तर बंगळुरुला प्लेऑफचं तिकिटही मिळवून दिलं. या विजयाने यश दयाल रॉयल चॅलेंजर्सचा स्टार खेळाडू बनलाय. अवघ्या एकचा वर्षांपूर्वी हाय यश दयाल व्हिलन ठरला होता. 2023 आयपीएलच्या एका सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या रिंकू सिंहने त्यावेळी गुजरात टायटन्समधून खेळणाऱ्या यश दयलाच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार लगावले. गुजरात टायटन्स हा सामना हरला आणि यश दयाल नैराश्यात गेला. 


बंळगुरुला जिंकून दिल्यानंतर आईला फोन
यश दयाल गुजरात संघाच्या चाहत्यांच्या नजरेतूनही उतरला होता. सर्व बाजूंनी त्याच्यावर टीका केली जाऊ लागली. चाहत्यांबरोबरच नातेवाईकांकडूनही यशवर टीका होऊ लागली. या नैराश्यातून आपली क्रिकेट कारकिर्द संपली असल्याचं यशनं आपल्या वडिलांना सांगितलं. मुलाचं हे दु:ख पाहून यशची आईचंही धैर्य संपलं होतं. मुलाच्या चेहऱ्यावरचं नैराश्य आई विसरू शकत नव्हती.


पण बंगळुरुला यश दयालला आपल्या संघात घेतलं आणि त्याच्यावर विश्वासही दाखवला. आपल्यावरचा विश्वास यावेळी मात्र यशने मोडू दिला नाही. चेन्नईला 17 धावांची गरज असताना यश दयालने केवळ सात धावा देत बंगळुरुला विजय मिळवून दिला. या विजयानंतर यश दयालने सर्वात आधी आपल्या आईला फोन केला. वर्षभर चिंतेत असलेल्या आईला फोन लावताच यश भावनिक झाला. त्याने आईला एकच प्रश्न विचारला 'आता कसं वाटतंय...' मुलाचे हे शब्द ऐकताच आईच्या डोळ्यात अश्रु तरळले. 


धोनीच्या षटकाराने वडिलही घाबरले
यश दयालचे वडील चंद्रपाल हे सुद्ध क्रिकेटर होते. ते मध्यमती गोलंदाजी करायचे. 2023 नंतर यश नैराश्यात गेला होता. त्यावेळी चंद्रपाल यांनी कुटुंबासाठी एक नियम बनवला. कुटुंबात कोणीही यशचा सामना पाहायचं नाही असं ठरवण्यात आलं. पण चेन्नईबरोबरचा सामना पाहण्यापासून स्वत: चंद्रपाल रोखू शकले नाहीत. यशच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार लगावल्यावर यशचे वडील चंद्रपाल पुरते घाबरले. 2023 च्या त्या वाईट क्षणांची पुनरावृत्ती होतेय की काय अशी भीती त्यांना वाटू लागली. पण यावेळी नशीब यशच्या बाजूने होतं.