IPL 2024 RR vs DC Playing 11: आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली असून आज 9 वा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Rajasthan Royals vs Delhi Capitals) यांच्यामध्ये रंगणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. यावेळी दोन्ही टीमचे कर्णधार 7 वाजता टॉससाठी मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघांच्या कामगिरी पाहिली तर राजस्थान रॉयल्सने त्यांच्या स्पर्धेची सुरुवात विजयाने केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान दिल्ली कॅपिटल्सला अजूनही विजयाचा सूर गवसलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्स पहिल्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स आठव्या स्थानावर आहे. आज दोन्ही टीम आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार असून टीम्सची संभाव्य प्लेईंग 11 आणि हेड टू हेडवर नजर टाकूया.


कशी आहे हेड-टू-हेड आकडेवारी


दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील दोन्ही टीम्सच्या हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोललो तर राजस्थान रॉयल्सने अधिक सामने जिंकले आहेत. आतापर्यंत दोन्ही टीम्सने एकूण 27 आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सने 14 सामने जिंकले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही टीम्समध्ये नेहमीच चुरशीची स्पर्धा दिसून आलीये. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण जिंकणार हे पहावं लागणार आहे.


पिच रिपोर्ट काय सांगतं?


जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जातेय. या खेळपट्टीवर आतापर्यंत एकूण दोन आयपीएल सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे या पिचवर फलंदाजांना रन्स करण्यासाठी फायदा मिळेल.


IPL 2024: राजस्थान रॉयल्सची संभावित प्लेइंग 11


यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन, रायन पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल/नांद्रे बर्जर, आर अश्विन, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.


IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सची संभावित प्लेइंग 11


डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, अभिषेक पोरेल, रिकी भुई, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार/कुमार कुशाग्रा, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा