IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होतेय. महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान  (RCB) पहिला सामना खेळवला जाणार आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या दोन युवा स्टार खेळाडूंना मोठं गिफ्ट दिलं आहे. बीसीसीआयने सर्फराज खान (Sarfaraz Khan) आणि ध्रुव जुरेलचा (Dhruv Jurel) सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्मध्ये समावेश केला आहे. बीसीसीआयच्या अपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलचा ग्रेड-सी मध्ये समावेश करण्याता आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्फराज खान यावेळच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीए. आयपीएलच्या ऑक्शनमध्ये दहापैकी एकाही संघाने सर्फराज खानवर बोली लावली नव्हती. त्याची बेसप्राईज 20 लाख रुपये इतकी होती. तर ध्रुप जुरेल राजस्थान रॉयल्स संघातून खेळताना दिसणार आहे. ध्रुवची बेसप्राईजही 20 लाख रुपये आहे. 


कसोटी पदार्पणणात दमदार कामगिरी
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये  समावेश झाल्याने सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला प्रत्येकी एक कोटी रुपये मिळणार आहेत. बीसीसीआयच्या नियमानुसार दोघांना प्रत्येक वर्षाला एक कोटींचं मानधन देण्यात येईल. नुकत्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका भारताने 4-1 अशी जिंकली होती. यात सर्फराज आणि ध्रुवने दमदार कामगिरी केली होती.  या कसोटी मालिकेत सर्फराज खानने सलग 3 अर्धशतकं झळकावली तर ध्रुवने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसऱ्याच सामनात 90 आणि 39 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. रांची कसोटी त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला.


बीसीसीआयची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट यादी (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024)


ग्रेड ए+
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.


ग्रेड ए
आर अश्विन, मो. शमी, मो. सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.


ग्रेड बी
सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जायसवाल.


ग्रेड सी
रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवि बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सैमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल.


सेंट्रल कॉन्ट्रेक्टमध्ये खेळाडूंना किती पैसे मिळतात
ग्रेड A+ - 7 कोटी रुपये प्रती वर्ष
ग्रेड A - 5 कोटी रुपये प्रती वर्ष
ग्रेड B - 3 कोटी रुपये प्रती वर्ष
ग्रेड C - 1 कोटी रुपये प्रती वर्ष


या खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून डच्चू
बीसीसीआय या वर्षी सेंट्रल कॉन्ट्रेक्टमधून ईशान किशन, श्रेयस अय्यर यांना डच्चू दिला आहे. श्रेयस ग्रेड बी मध्ये तर ईशानचा ग्रेड सीमध्ये समावेश करण्यात आला होता. याशिवाय उमेश यादव, शिखर धवन, दीपक हुड्डा आणि युजवेंद्र चहल यांनाही सेंट्र्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.