Shikhar Dhawan in DY Patil T20 : येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रिमियर लीगला (IPL 2024) सुरूवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला आयपीएलचा सामना खेळवला जाईल. तर दुसरा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात येत्या 23 तारखेला खेळवला जाणार आहे. अशातच आता पंजाब किंग्ससाठी (Punjab Kings) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंजाब किंग्सचा गब्बर शिखर धवन आता फॉर्ममध्ये परत आला आहे. शिखर धवनने डीवाय पाटील टी-ट्वेंटी (DY Patil T20 Cup) लीगमध्ये 99 धावांची प्रभावी खेळी केली. नऊ फोर अन् सहा सिक्सच्या मदतीने शिखरने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवनची 99 धावांची नाबाद खेळी निरर्थक ठरली कारण गुरुवारी डीवाय पाटील स्टेडियमवर 18व्या डीवाय पाटील टी-20 चषकाच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीत डीवाय पाटील ब्लूचा कॅगविरुद्ध सहा गडी राखून पराभव झाला. मात्र, शिखरच्या खेळीमुळे पंजाबचे चाहते आनंदी झाले आहेत. तर डीवाय पाटील विद्यापीठाच्या मैदानावर दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत टाटा स्पोर्ट्स क्लबने इंडियन ऑइलवर 60 धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केलंय.


अभिजित तोमर आणि शिखर धवन यांनी चौफेर फटकेबाजी केली अन् धावा कुटल्या. या दोघांनी 52 धावांची खेळी केली. त्यामुळे डीवाय पाटील ब्लूला चांगली सुरूवात मिळाली. मात्र, एकटा शिखर लढत असताना दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत राहिल्या अन् ब्लुला सामना गमवावा लागला. 


IPL 2024 वेळापत्रक


२२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
२३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
२४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनऊ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
२४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
२५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
२६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
२७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
२८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
२९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३० मार्च - लखनऊ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
१ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
२ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखनऊ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
७ एप्रिल - लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनऊ