Kavya Maran reaction video viral : IPL च्या यंदाच्या हंगामात मोठ्या संघांनी निराशाजनक कामगिरी केलेली असतानाच आरसीबीच्या संघानं अखेरच्या टप्प्यामध्ये चांगलं प्रदर्शन करत अंतिम फेरीचं स्वप्न पाहिलं. पण, हे स्वप्न साकार करणं मात्र संघाला शक्य झालं नाही. याच स्वप्नासह हैदराबादचा संघ क्वालीफायर 2 सामन्यासाठी राजस्थानच्या संघाविरोधात (srh vs rr qualifier 2 ) मैदानात उतरला आणि संघानं असा काही खेळ दाखवला, की थेट अंतिम सामन्यातच धडक मारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखाली हैदराबादच्या संघानं कमाल खेळी करत अंतिम सामना गाठला आणि इथं राजस्थानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. अंतिम सामन्यात हैदराबादच्या संघासमोर आता कोलकाता नाईट रायडर्स अर्थात केकेआरचं आव्हान असेल. संघ अंतिम सामन्यासाठी नेमकी कशी खेळी करेल हे आता काही तासांनी सर्वांसमोर येईलच, पण, संघाची मेहनत त्यांना इथवर येण्यास प्रेरणा देत राहिली, याहून आनंदाची बाब नाही आणि हाच आनंद संघाची मालकी असणारी काव्या मारनही आवरु शकली नाही. 


हैदराबादच्या संघानं ज्या क्षणी अंतिम सामना गाठला त्या क्षणी भर मैदानात काव्या मारननं दिलेली प्रतिक्रिया सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. आनंदाच्या भरात उड्या मारणारी आणि बेभान होऊन धावत जाऊन वडिलांना मिठी मारणारी काव्या पाहताना नकळतच नेटकऱ्याच्या चेहऱ्यावरही हसू आलं. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि वारंवार पाहिलाही गेला. 



संघाला काव्यानं कायम दिली साथ... 


संघानं चांगली कामगिरी करो अथवा संघाच्या वाट्याला अपयश येवो, काव्या मारन कायमचत तिच्या मालकीच्या या संघाला साथ देताना दिसली. यंदाच्या वर्षी आयपीएलसाठी पार पडलेल्या लिलावाच्यावेळीसुद्धा तिनं हजेरी लावत पॅट कमिन्सला संघात जागा दिली होती. 20 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावलेल्या याच पॅट कमिन्सनं काव्याचा विश्वास सार्थ ठरवत संघाचं उत्तम नेतृत्त्वं करत थेट अंतिम सामना गाठला. 


हेसुद्धा वाचा : Pakistan squad : टी-ट्वेंटी वर्ल्डसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, विराटच्या दुश्मनाला मिळाली संधी


 


आयपीएलमधील हैदराबादच्या संघाच्या कामगिरीविषयी सांगावं तर, मागील हंगामात या संघाला फारसा चांगला खेळ दाखवता आला नव्हता. यंदा मात्र हाच संघ जेतेपदापासून अवघं एक पाऊल दूर आहे. 2016 मध्ये हैदराबादच्या संघानं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तेव्हा त्याच विजयाची पुनरावृत्ती आता संघ करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.