टीम इंडियात संधी मिळेना, IPL 2024 लिलावात या खेळाडूवर लागली 11.75 कोटींची बोली
IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी पार पडलेल्या लिलावत ऑस्ट्रेलियाच्याच खेळाडूंचा बोलबाला होता. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेडवर कोट्यवधींची बोली लागली. पण यातही एका भारतीय खेळाडूने बाजी मारली. पंजब किंग्सने त्याच्यासाठी तब्बल 11.75 ची बोली लागली.
Harshal Patel IPL Team 2024: आयपीएल 2024 साठी दुबईतल्या कोका-कोला एरिनात (Coca-Cola Arena ) लिलाव पार पडला. या लिलावत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बाजी मारली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starck) आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सने स्टार्ससाठी तब्बल 24.75 कोटी रुपये मोजले. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर (Pat Cummins) सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये खर्च केले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शानदार सेंच्युरी करणारा ट्रेव्हिस हेड सनरायजर्स हैदराबादकडे 6.80 कोटी रुपयांना विकला गेला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ सुरु असतानाच एका भारतीय गोलंदाजाने कोटीची उड्डाणं घेतली.
भारतीय गोलंदाजावर कोट्यवधीची बोली
आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलवर (Harshal Patel) कोट्यवधींची बरसात झाली. आयपीएलच्या यंदाच्या लिलावतील तो सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला. पंजाब किंग्जने हर्षल पटेलवर 11.75 कोटी रुपयांची बोली लावली. हर्षल पटेल भारतासाठी शेवटचा टी20 सामना जानेवारी 2023 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय क्रिकेट संघात संधी मिळालेली नाही.
गुजरात टायटन्सने केली सुरुवात
गुजरात टायटन्सने 33 वर्षांच्या हर्षल पटेलवर बोली सुरुवात केली. त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने यात उडी घेतली. पंजाब आणि लखनऊमधली चढाओढ 10 कोटींपर्यंत आली. त्याचवेळी पंजाबने यात एन्ट्री घेतली. पंजाबने हर्षलसाठी थेट 11.75 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. हरियाणाच्या या वेगवान गोलंदाजावर आयपीएल 2022 मध्ये रॉयव चॅलेंजर्स बंगळुरुने 10.75 कोटी रुपयांची बोली लावली होती.
2021 मध्ये पर्पल कॅप
हर्षल पटेल आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळाताना हर्षल पटेलने 15 सामन्यात 31 विकेट घेतल्या होत्या. पण गेल्या हंगामात हर्षल पटेल फारसा चालला नाही. 13 सामन्यात त्याला केवळ 14 विकेट घेता आल्या. त्यामुळे आरसीबीने हर्षल पटेलला नव्या हंगामात कायम ठेवलं नाही.
वर्षभरापासून टीम इंडियाबाहेर
2021 मध्ये हर्षल पटेलने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पम केलं. हर्षल भारतासाठी आतापर्यंत 25 सामने खेळला आहे. यात त्याने 29 विकेट घेतल्यात. 25 धावात 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 3 जानेवारी 2023 मध्ये तो भारतासाठी शेवटचा टी20 सामना खेळला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत-श्रीलंका टी20 सामना खेळवण्यात आला होता.