IPL 2024 Sunrisers Hyderabad Captain: इंडियन प्रीमिअर लीगचं 17 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. अवघ्या 3 आठवड्यांवर ही स्पर्धा आली असून त्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मोठी घोषणा केली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. आज सकाळी 11 वाजता सोशल मीडियावरुन केलेल्या एका पोस्टमध्ये संघाचा नवीन कर्णधार कोण असेल हे संघाने जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमधील कर्णधार पॅट कमिन्स आता सनरायझर्स हैदराबादचाही कर्णधार असणार आहे. 


हैदराबादचा 10 वा कर्णधार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ट्वीटरवरुन ही घोषणा केली आहे. "ऑरेंज आर्मी, आयपीएल 2024 साठी आपला नवीन कर्णधार पॅट कमिन्स", अशा कॅप्शनसहीत फोटो शेअर केला आहे. कमिन्सने दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमची जागा घेतली आहे. कमिन्स हा सनरायझर्स हैदराबादचा 10 वा कर्णधार असणार आहे. पॅट कमिन्सला एवढी मोठी जबाबादारी सोपवण्यामागे त्याची कर्णधार म्हणून जागतिक क्रिकेटमधील कामगिरी कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे.


...म्हणून सोपवली जबाबदारी


पॅट कमिन्सच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली जाईल अशी चर्चा होती. कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने तब्बल 20.5 कोटी रुपये यंदाच्या आयपीएल लिलावात खर्च केलेत. कमिन्सने आपल्या नेतृत्वाची छाप आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर पाडली आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 2023 मध्ये आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकल्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपची स्पर्धा ऑस्ट्रेलियाने कमिन्सच्या नेतृत्वाखालीच जिंकली. दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघालाच धूळ चारली.


नक्की पाहा >> रस्त्यावर चक्क गोट्या खेळतोय 'हा' भारतीय क्रिकेपटू; 'इन्स्टा'वर शेअर केली स्टोरी


पॅट कमिन्स हा उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे.  2023 मध्ये कमिन्स एकूण 24 सामने खेळाला. त्याने यात 422 धावा केल्या आणि 59 विकेट्स घेतल्या. सामन्यातील स्थितीचं आकलन करुन गोलंदाज बदलणे, धावा जमवणे यासारख्या गोष्टी कमिन्स अगदी सहज करताना दिसतो. 



मालकीण चर्चेत


पॅट कमिन्सला तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादच्या संघाने करारबद्ध केलं. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने 20 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. अर्थात अर्ध्या तासामध्ये पॅट कमिन्सचा सर्वाधिक बोलीचा विक्रम त्याचा संघ सहकारी मिचेल मार्शने मोडीत काढत तब्बल 24.75 कोटींची बोली मिळवली आहे. मात्र पॅट कमिन्ससाठी तब्बल 20 कोटींहून अधिकची बोली लावल्यामुळे सन रायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारनही आयपीएल लिलावादरम्यान चर्चेत होत्या.