IPL 2025 Mumbai Indians : आयपीएल 2025 (IPL 2025) साठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑस्कन पार पडणार आहे. सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात हे ऑक्शन होणार असून यात उत्कृष्ट खेळाडूंचा आपल्या संघात समावेश करण्यासाठी सर्व संघ तयारीत आहेत. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ऑक्शनपूर्वी त्यांच्या 5 खेळाडूंना रिटेन केलं असून यात रोहित शर्मा, हार्दिक पंड्या (Hardik Pandya), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. मात्र आयपीएल 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसलाय. कारण आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईच्या कर्णधारावर बॅन लावण्यात आलेला आहे. 


एका सामन्याची बंदी:  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2024 पूर्वी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सने ट्रेड करून आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर मुंबईने हार्दिकवर कर्णधार पदाची जबाबदारी सुद्धा सोपवली. मात्र त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स सीजनमध्ये चांगली कामगिरी करू शकली नाही आणि परिणामी मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानी राहिले. यादरम्यान आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने लखनऊ विरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यात झालेल्या चुकांमुळे पंड्यावर आणि संपूर्ण संघावर कारवाई करण्यात आली होती. वानखेडे स्टेडियमवर लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स त्यांचे ओव्हर्स वेळेतपूर्ण करू शकली नव्हती. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमांनुसार हार्दिक पंड्यावर एका सामन्याचा बॅन लावण्यात आला होता. पंड्या आयपीएल 2025 मध्ये कोणत्या दुसऱ्या संघासाठी खेळला असता तरी त्याला एका सामन्याची बंदी झेलावीच लागली असती, मात्र मुंबईने हार्दिक पंड्याला रिटेन केल्यामुळे तो पुढील आयपीएलमध्ये सुद्धा मुंबई इंडियन्सकडूनच खेळताना दिसेल. 


कोणत्या नियमामुळे लागला बॅन : 


मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे कर्णधार हार्दिकवर बीसीसीआयने 30 लाखांचा दंड आणि एक सामन्याच्या बंदीची कारवाई केली आहे. तसेच इम्पॅक्ट प्लेअर सहित प्लेईंग 12 वर मॅच फीच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून आकारली गेली. आयपीएल 2024 मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे एक सामन्याच्या बंदीची कारवाई झालेला हार्दिक पंड्या हा पहिला कर्णधार नव्हता. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला सुद्धा आरसीबी विरुद्धच्या सामन्यात बंदीच्या कारवाईमुळे खेळता आले नव्हते. 


हेही वाचा : 'थोडं ज्ञान स्वतःच्या....', संजय मांजरेकरांवर भडकला शमी! थेट Insta स्टोरीमधून झापलं; एकदा पाहाच


हार्दिक पंड्यासाठी मोजले 16.35 कोटी रुपये :


मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहला 18  कोटींना रिटेन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बुमराह हा जगातील सर्वात उत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. मुंबईने बुमराहनंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याला 16.35 कोटी देऊन रिटेन केले. तर रोहित शर्मासाठी 16.30  कोटी तर तिलक वर्मासाठी 8 कोटी मोजले आहेत. 6 पैकी 5 खेळाडूंना रिटेन करून मुंबई इंडियन्सने RTM कार्ड राखून ठेवलं आहे.