Mohammad Shami On Sanjay Manjarekar : भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी मागील जवळपास वर्षभरापासून दुखापतीच्या कारणामुळे टीम इंडियाच्या बाहेर होता. वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर त्याने रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना दमदार कमबॅक केले. त्याने या सामन्यात जवळपास 8 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी (Mohammad Shami) दुखापतीमुळे आयपीएल 2024 ला मुकला होता, गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) पुढील सीजनसाठी शमीला रिटेन न केल्यामुळे तो मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झालेला आहे. मात्र ऑक्शनमध्ये शमी विकल्या जाण्याच्या शक्यतांचे विश्लेषण करताना संजय मांजरेकर (Sanjay Manjarekar) म्हणाले की, दुखापतीने त्रस्त असलेल्या या वेगवान गोलंदाजाच्या किंमतीत मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावरून आता शमीने सोशल मीडियावर पोस्ट करुन मांजरेकरांना चांगलच सुनावल आहे.
जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यंदाचं हे ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह या शहरात होणार असून हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात भव्यदिव्य ऑस्कन असेल. यंदा ऑस्कनमध्ये 1500 हुन अधिक खेळाडूंनी आपलं नाव नोंदवलं होतं तर यापैकी केवळ 574 खेळाडूंवरच बोली लागणार आहे.
माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, 'संघ नक्कीच स्वारस्य दाखवतील परंतु मोहम्मद शमीच्या दुखापतीचा इतिहास पाहता, त्याची दुखापत बरी होण्यासाठी बराच वेळ लागला होता. जर एखाद्या फ्रेंचायझीने त्यांच्यावर मोठी गुंतवणूक केली आणि दुखापतीमुळे सीजनच्या मध्यातच शमी खेळू शकला नाही तर त्यांचे पर्याय हे मर्यादित होतात आणि याच चिंतेमुळे ऑक्शनमध्ये शमीच्या किंमतीत मोठी घट होऊ शकते'.
संजय मांजरेकरच्या विश्लेषणावर प्रतिक्रिया देताना मोहम्मद शमीने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत म्हटले की, 'बाबा चा विजय असो. थोडं ज्ञान हे स्वतःच्या भविष्यासाठी सुद्धा जपून ठेवा, कमी येईल. संजय जी? कोणाला स्वतःचच्या भविष्याबाबत जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी सरांना भेटा'.
Mohammed Shami&39;s Instagram story on Sanjay Manjrekar&39;s statement about the price tag for IPL 2025 pic.twitter.com/04fCmsoK7U
— Johns. (CricCrazyJohns) November 21, 2024
आयपीएल 2022 मध्ये मोहम्मद शमीला गुजरात टायटन्सने 6.25 कोटींना विकत घेतले होते. यावेळी शमीने वर्ष 2022 आणि 2023 मध्ये 33 सामने खेळून 48 विकेट्स घेतले. आयपीएल 2023 मध्ये शमी पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. त्या सीजनमध्ये त्याने 17 इनिंगमध्ये 28 विकेट्स घेतले होते. मोहम्मद शमी हा बंगालच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी तयारी करत आहे. यात शमीने चांगले परफॉर्म केले तर त्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या हाफमध्ये टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळू शकते.