IPL 2025: आयपीएल 2025 साठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मेगा लिलाव होणार आहे. या मेगा लिलावा आधी अनेक गोष्टींची चर्चा होत आहे. यंदाच्या सिजनपासून बीसीसीआयने काही नियम कायम ठेवले आहेत तर काहींमध्ये बदल केले आहे. बीसीसीआयने रिटेंशनचे नियम जाहीर केले असून लिलावासाठीची जागा लवकरच जाहीर केली जाईल. सौदी अरेबिया किंवा सिंगापूरमधील कोणत्याही शहरात हा लिलाव आयोजित केला जाऊ शकतो, अशी सध्या चर्चा आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे अनेक मिक्स पडसाद पडत आहेत. मुंबई इंडियन्सने आपले मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांना बडतर्फ केले आहे.


कोण होणार मुख्य प्रशिक्षक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने मार्क बाऊचरच्या जागी श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू महेला जयवर्धनेची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. जयवर्धने यांनी यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. जयवर्धन यांनी 2017 ते 2022 पर्यंत संघाचे प्रशिक्षक होते. या कालावधीत मुंबई इंडियन्सने 3 विजेतेपद पटकावले. जयवर्धनला रोहितच्या नेतृत्वाखाली संघाला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश आले. 


मार्क बाउचर होता हार्दिकचा आवडीचा 


हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सचा संघ सोडला आणि गुजरात टायटन्समध्ये तो सामील झाला. त्याने तिकडे आपल्या नेतृत्वाखाली संघाला चॅम्पियन बनवले. हार्दिक जेव्हा मुंबईत आला तेव्हा त्याला खूप ट्रोल करण्यात आले. यावेळी मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी त्याचा बचाव केला होता. बाउचर आणि हार्दिक यांच्यातील समन्वय चांगला होता. आता मुंबईचा कर्णधार जयवर्धनेसोबत कसा ताळमेळ ठेवतो हे पाहायचे आहे.


 



काय म्हणाले जयवर्धने?


जयवर्धने म्हणाले, “एमआय कुटुंबातील माझा प्रवास नेहमीच विकासाचा राहिला आहे. 2017 मध्ये माझे लक्ष खेळाडूंच्या प्रतिभावान गटाला एकत्र आणण्यावर होते. त्यांनी आतापर्यंतचे सर्वोत्तम क्रिकेट खेळले आणि आम्ही खूप चांगले केले. आता पुनरागमन करण्याच्या विचारात आहे. हे एक आव्हान आहे ज्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”