IPL Auction 2018: अखेर ख्रिस गेलला लॉटरी लागली
आयपीएल २०१८च्या लिलावात स्टार बॅट्समन ख्रिस गेलला पहिल्या दिवशी कुणीच खरेदी केलं नव्हतं. पण आता गेलची लॉटरी लागली असून त्याला खरेदीदार मिळाला आहे.
बंगळुरु : आयपीएल २०१८च्या लिलावात खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लावली गेली. मात्र, स्टार बॅट्समन ख्रिस गेलला पहिल्या दिवशी कुणीच खरेदी केलं नव्हतं. पण आता गेलची लॉटरी लागली असून त्याला खरेदीदार मिळाला आहे.
पहिल्या दिवशी खरेदीदार न मिळाल्याने आश्चर्य
टी-२० आणि आयपीएलमध्ये ख्रिस गेलने आपला जलवा दाखवत अक्षरश: सिक्सरचा पाऊस पाडला. मात्र, तरिही त्याला कुणीही खरेदीदार न मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
हे पण पाहा: BCCIने चुकीने या क्रिकेटरच्या भावाला मिळाली होती टीममध्ये एन्ट्री, IPLमध्ये बनला करोडपती
पुन्हा पडणार सिस्करचा पाऊस
ख्रिस गेलला खरेदीदार न मिळाल्याने गेलचा जलवा पुन्हा पहायला मिळणार नाही असं सर्वांनाच वाटत होतं. पण आता गेलला खरेदीदार मिळाल्याने पुन्हा एकदा रेकॉर्ड्स आणि सिस्करचा पाऊस पडणार असल्याचं दिसत आहे.
या टीमने गेलला केलं खरेदी
वेस्ट इंडिजचा स्टार बॅट्समन असलेल्या ख्रिस गेलला किंग्स इलेव्हन पंजाबच्या टीमने खरेदी केलं आहे. ख्रिस गेल याची बेस प्राईस दोन कोटी होती आणि त्याला पंजाबच्या टीमने दोन कोटी रुपयांत खरेदी केलं आहे.
आयपीएल लिलावामधील दुसऱ्या दिवसाच्या पाचव्या राऊंडमध्ये तिसऱ्यांदा बोली लागली आणि पंजाबने गेलला खरेदी केलं आहे.
गेलचा आयपीएलमध्ये जलवा
२०११, २०१२ आणि २०१३ या वर्षांत ख्रिस गेलने ६००हून अधिक रन्स केले. १७५ हा ख्रिस गेलचा नॉट आऊट सर्वश्रेष्ठ स्कोअर राहीला आहे. गेलने १०१ आयपीएल मॅचेसमध्ये ३६२६ रन्स केले. ज्यामध्ये पाच सेंच्युरी आणि २१ हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. गेलने आयपीएलमध्ये एकूण २९४ फोर आणि २६५ सिक्सर लगावले आहेत. तर, २३ कॅचेसही घेतल्या आहेत.
२०१४ साली गेलची कामगिरी खूपच निराशाजनक राहीली. २०१४ या वर्षात झालेल्या आयपीएलमध्ये त्याने ९ मॅचेस खेळत १९६ रन्स बनवले. तर, २०१५मध्ये त्याने पुनरागमन केलं आणि १४ मॅचेसमध्ये ४९१ रन्स बनवले. तर, २०१६मध्ये गेलने १० मॅचेस खेळत २२७ आणि २०१७ मध्ये ९ मॅचेस खेळत २०० रन्स केले.