BCCIने चुकीने या क्रिकेटरच्या भावाला मिळाली होती टीममध्ये एन्ट्री, IPLमध्ये बनला करोडपती
आयपीएल २०१८च्या लिलावाचा आज दुसरा दिवस असून खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.
मुंबई : आयपीएल २०१८च्या लिलावाचा आज दुसरा दिवस असून खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या दिवसाची पहिली बोली ही युवा क्रिकेटर राहुल चाहर याच्यावर लागली. २० लाख रुपये बेस प्राईस असलेल्या राहुल चाहर याला मुंबई इंडियन्सने १ कोटी ९० लाख रुपयांत खरेदी केलं आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये राहुल चाहरने जबदरस्त बॉलिंगचं प्रदर्शन दाखवत सहा विकेट्स घेतले होते. मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये १८ वर्षीय राहुल चाहरने गौतम गंभीरसमोर अशी बॉलिंग केली की त्याला बॉल कळलाच नाही आणि आऊट झाला.
गौतम गंभीर सारख्या सीनिअर खेळाडूला आऊट केल्यानंतर राहुल चाहरची सर्वत्र चर्चा होत होती. कदाचित यामुळेच राहुलला IPLमध्ये करोडपती बनण्याची संधी मिळाली आहे.
...म्हणून राहुलची होत होती चर्चा
केवळ एक फर्स्ट क्लास मॅच खेळणारा राहुल चाहर यापूर्वी बीसीसीआयच्या एका चुकीमुळे चर्चेत होता. मध्यंतरी बीसीसीआयने चुकीने लेग स्पिनर राहुलच्या ऐवजी त्याच्या चुलत भाऊ दीपक चाहर याची न्यूझीलंडविरोधात प्रॅक्टीस मॅचसाठी बोर्ड अध्यक्षांनी टीममध्ये सहभागी केलं होतं. ही गोष्ट मीडियात आल्यानंतर बीसीसीआयला आपल्याकडून चूक झाल्याचं कळलं. त्यानंतर दीपकच्या जागी राहुलला संधी देण्यात आली.
IPLमध्ये राहुलचा प्रवास
राहुल चाहर IPLमध्ये रायझिंग पुणे जाइंट्सच्या टीमकडून खेळला आहे. तीन मॅचेसमध्ये राहुलने नॉट आऊट ३ रन्स केले होते. तर, २ विकेट्सही घेतले होते. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज बॅट्समन हाशिम आमला याची विकेट घेत राहुल चाहरने IPLमध्ये पहिला बळी घेतला.
राहुलने नोव्हेंबरमध्ये २०१६मध्ये १७ वर्षांचा असताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. राहुल चाहरच्या प्रदर्शनावर नजर टाकली तर त्याच्या बॅटिंगपेक्षा बॉलिंग सरस आहे. बॉलिंगमध्ये लेग ब्रेक गुगली ही त्याची ताकद आहे.