कोलकाता : आयपीएलच्या २०२० सालच्या मोसमासाठीचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला. गतविजेत्या मुंबईने या लिलावामध्ये एकूण ६ खेळाडूंना विकत घेतलं. यामुळे मुंबईची टीम आता २४ खेळाडूंची झाली आहे. मुंबईने लिलावामध्ये क्रिस लीन, नॅथन कुल्टर-नाईल, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख आणि प्रिन्स बलवंत राय या खेळाडूंना विकत घेतलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या टीमने नॅथन कुल्टर नाईलसाठी ८ कोटी रुपये, क्रिस लीनसाठी २ कोटी रुपये, सौरभ तिवारीसाठी ५० लाख, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख आणि प्रिन्स बलवंत राय यांच्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये मोजले.


आयपीएल लिलावाआधी मुंबईने शेफरेन रदरफोर्ड आणि ट्रेन्ट बोल्टला दिल्लीकडून तसंच धवल कुलकर्णीला राजस्थानकडून विकत घेतलं होतं. तर एव्हिन लुईस, ऍडम मिलने, जेसन बेहरनडॉर्फ, ब्युरन हेन्ड्रिक्स, बेन कटिंग, युवराज सिंग, बरिंदर श्रन, रसीक सलाम, पंकज जसवाल, अल्झारी जोसेफ या खेळाडूंना मुंबईने सोडलं. तर मयंक मार्कंडे आणि सिद्धेश लाडला मुंबईने दुसऱ्या टीमना दिलं.


मुंबईची नवी टीम


रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्विंटन डिकॉक, मिचल मॅकलॅनघन, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, राहुल चहर, इशान किशन, अनुकूल रॉय, आदित्य तरे, जयंत यादव, ट्रेन्ट बोल्ट, धवल कुलकर्णी, शरफेन रदरफोर्ड, क्रिस लीन, नॅथन कुल्टर नाईल, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय


आयपीएल लिलाव : या खेळाडूंवर लागली बोली