IPL Auction 2023: यंदाची आयपीएल (IPL 2023) जिंकणं मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai indians) कठीण नसणार आहे, याचं कारण म्हणजे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एका तगड्या प्लेअरची एन्ट्री केली आहे. मुख्य म्हणजे हा खेळाडू किरण पोलॉर्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पंड्यापेक्षा (Hardik Pandya) अनेक पट धोकादायक असल्याचं, अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स सहावी ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरोन पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे, तर हार्दिक पंड्याला मुंबईन रिलीज केलं होतं. आणि आता तो गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. अशात मुंबई इंडियन्सची ताकद कमी झाली होती, मात्र आता या खेळाडूच्या एन्ट्रीने मुंबई इंडियन्सची टीम स्ट्राँग होणार आहे. 


'या' खेळाडूची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री


मुंबई इंडियन्सच्या टीमने आयपीएल 2023 सिझनसाठी ऑस्ट्रेलियाचा धोकादायक ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनला 17.25 कोटींना खरेदी केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन आयपीएलच्या इतिहासात दुसरा सर्वात महागडा विकला गेलेला खेळाडू आहे. 


ऑस्ट्रेलियाच्या ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन विस्फोटक फलंदाजी आणि उत्तम गोलंदाजी करतो. या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या टी-20 सिरीज खेळण्यासाठी आली होती, त्यावेळी कॅमरूनने तुफान फलंदाजी करत गोलंदाजांची दाणादाण उडवली होती. 


MI ची सहावी ट्रॉफी पक्की!


कॅमरून ग्रीनने भारताविरूद्ध मोहालीमध्ये 20 डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 30 बॉल्समध्ये 61 रन्स केले होते. ज्यामध्ये 8 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. या सामन्यात ग्रीनने एक विकेट देखील घेतली होती. यानंतर ग्रीनने सप्टेंरमध्ये हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 21 बॉल्समध्ये 52 रन्स केले होते, ज्यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. 


सॅम करन ठरला सर्वात महागडा खेळाडू


इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनला (Sam Curran) आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajastan royals) यांच्यात भिडत लागली होती. मात्र, अचानक पंजाब किंग्जने (Panjab Kings) ऑक्शनमध्ये उडी मारली आणि सॅम करनला आपल्या ताफ्यात घेतलं.


आयपीएल 2021च्या लिलावात मॉरिसवर 16.25 कोटी इतकी बोली लावली होती. राजस्थान रॉयल्सने त्याला संघात घेतलं होतं. युवराजला 2015 साली 16 कोटींना दिल्ली संघाने खरेदी केलं होतं. पंजाबला एकदाही ट्रॉफी जिंकता आलं नाही. त्यामुळे आता सॅम करनच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलंय.