IPL Auction 2023 : अरे, कोणीतरी बोली लावा..! `ही` मोठीमोठी नावं ऑक्शनमध्ये Unsold
सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलंय. मात्र काही खेळाडू असे आहेत, ज्यांना कोणी खरेदीदार मिळाला नाही.
IPL Auction 2023 : पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडतोय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग नोंदवला आहे. या ऑक्शनमध्ये सर्वात मोठा जॅकपॉट हा इंग्लंडचा सॅम करनला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागलीये.
सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलंय. त्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajastan royals) यांच्यात भिडत लागली होती. मात्र, अचानक पंजाब किंग्जने (Panjab Kings) ऑक्शनमध्ये उडी मारली आणि सॅम करनला आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र काही खेळाडू असे आहेत, ज्यांना कोणी खरेदीदार मिळाला नाही.
आयपीएल 2023 च्या ऑक्शनममध्ये कोणत्या खेळाडूंसाठी लागली नाही बोली-
जो रूट (इंग्लंड) - बेस प्राईस 1 कोटी
राइले रॉसो (दक्षिण आफ्रिका)- बेस प्राईस 2 करोड़
शाकिब अल हसन (बांग्लादेश) – बेस प्राईस- 1.5 कोटी
लिटन दास (बांग्लादेश)- बेस प्राईस 50 लाख
कुशल मेंडिस (श्रीलंका)- बेस प्राईस 50 लाख
टॉम बॅंटन (इंग्लंड)- बेस प्राईस 50 लाख
क्रिस जॉर्डन (इंग्लंड)- 2 कोटी बेस प्राईस
एडम मिल्ने (न्यूझीलंड)- बेस प्राईस 2 कोटी
अकील हुसैन (वेस्ट इंडीज)- 1 कोटी बेस प्राइस
एडम झम्पा (ऑस्ट्रेलिया)- 1.50 कोटी बेस प्राईस
तबरेज शम्सी (दक्षिण आफ्रिका)- 1 कोटी बेस प्राईस
मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान)- 1 कोटी बेस प्राईझ
अनमोलप्रीत सिंह (भारत)- बेस प्राईस 20 लाख
एल.आर. चेतन (भारत)- बेस प्राईस 20 लाख
शुभम खजूरिया (भारत)- बेस प्राईस 20 लाख
रोहन कुन्नूमल (भारत)- बेस प्राईस 20 लाख
हिम्मत सिंह (भारत)- 20 लाख बेस प्राईस
प्रियम गर्ग (भारत)- 20 लाख बेस प्राईस
सौरभ कुमार (भारत)- बेस प्राईस 20 लाख
कॉर्बिन बोस्च (दक्षिण आफ्रिका)- 20 लाख बेस प्राईस