IPL Auction 2024 Why Gambhir Spend 24 Crore On Mitchell Starc: जगातील सर्वात लोकप्रिय टी-20 लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 2024 च्या पर्वासाठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी पार पडला. दुबईमध्ये पार पडलेल्या या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. ऑस्ट्रेलियन संघाला एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग असलेल्या मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने तब्बल 24 कोटी 75 लाख रुपये मोजले. आयपीएलच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. मिचेल स्टार्कला संघात घेण्यासाठी संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर फारच उत्साही दिसत होता. त्यानेच एवढी मोठी बोली लावून स्टार्कला संघात घेतलं.


गंभीरच लावत होता बोली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 च्या पर्वामध्ये लखनऊच्या संघासाठी मेंटॉर म्हणून काम केलेला गौतम गंभीर पुन्हा केकेआरकडे परतला आहे. आयपीएलच्या लिलावामध्ये मंगळवारी गंभीरच केकेआरच्यावतीने मिचेल स्टार्कसाठी बोली लावता लावता अगदी 24 कोटी 75 लाखांपर्यंत पोहोचला. संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वँकी मैसूर यांनी गौतमने मिचेल स्टार्कवर एवढी मोठी बोली गौतम गंभीरने का लावली याबद्दलचा खुलासा केला आहे.


नक्की वाचा >> IPL ची नवी रन-मशीन 5.8 कोटींना RR कडे तर नव्या Sixer King साठी CSK ने मोजले 8.4 कोटी


...म्हणून खर्च केली एवढी रक्कम


सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला 20 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावत संघात सहभागी करुन घेतलं. त्यानंतर काही तासांमध्येही केकेआरच्या संघाने मिचेल स्टार्कसाठी याहूनही मोठी बोली लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याबद्दल बोलताना मैसूर यांनी, "त्याचं कौशल्य पाहून आम्ही त्याला (स्टार्कला) प्रथम प्राधान्य दिलं. पहिल्या काही बोली लावल्या तेव्हा आम्हाला यश आलं नाही. मात्र याचा आम्हाला फायदा झाला. आधीच्या बोली अपयशी ठरल्याने त्याच्यासाठी (स्टार्कसाठी) बोली लावायला आमच्याकडे बरेच पैसे उरले. त्याला आम्ही संघात घेऊ शकतो याचं फार समाधान वाटतंय. या किंमतीवरुन त्याचे मूल्य आणि त्याच्या कौशल्याचा अंदाज बांधता येतो. तो फारच उत्तम खेळाडू आहे," असं मैसूर म्हणाले.


नक्की वाचा >> 'काव्या मारन सुंदर आहे पण तिला अक्कल नाही!' IPL Auction मधल्या एका निर्णयाने ती ट्रोल



2008 साली आयपीएल सुरु झालं तेव्हा...


एखाद्या विशिष्ट खेळाडूवर पैसे खर्च करणे हा प्रत्येकाच्या दृष्टीकोनाचा विषय आहे असं मैसूर म्हणाले. प्रत्येक संघ थोड्या फार फरकाने हे करतो. प्रत्येक संघाला त्यांच्याकडील पैसे त्यांच्या पद्धतीने खर्च करायची मूभा असते.


नक्की वाचा >> पॅट कमिन्सवर तब्बल 20.5 कोटी उडवणाऱ्या काव्या मारनची एकूण संपत्ती पाहून डोळे फिरतील


"आता असं वाटतंय की, अरे ते 24.75 कोटी रुपये आहेत. मी कोणाला तरी सांगत होतो की 2008 साली आयपीएल सुरु झालं तेव्हा एका संघासाठीची रक्कम मर्यादा 20 कोटी होती. आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. जेव्हा लिलाव संपतो तेव्हा 10 संघ 100 कोटी रुपये खर्च करुन मोकळे झालेले असतात. प्रत्येक संघ याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात," असं मैसूर यांनी सांगितलं.