मुंबई : प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी रात्री उशिरा उघड झालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एक मोठा आणि अनुभवी खेळाडू ख्रिस गेलने (chris gayle) टीमला सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. ज्यामुळे टीमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आज म्हणजेच 1 ऑक्टोबरला पंजाबचा सामना कोलकाता सोबत होणार आहे. अशात काल अचानक गेलच्या जाण्याने टीमला मोठा धक्का बसला आहे. कारण गेलच्या जाण्याने टीममध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिस गेलने आयपीएलचा सध्याचा हंगाम सोडून टी -20 विश्वचषकासाठी स्वतःला मानसिकरित्या तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आणि गेलच्या या निर्णयाची माहिती दिली.


फ्रँचायझीने उघड केले की ख्रिस गेलने पंजाब किंग्ज हॉटेल आणि बायो बबल सोडले आहे. आता ते उर्वरित सामन्यांमध्ये दिसणार नाहीत.


विशेष म्हणजे, कोरोना कालावधीनंतर क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यापासून ख्रिस गेल (chris gayle) बायो बबलचा एक भाग आहे. तो वेस्ट इंडिजसाठी, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. मग सीपीएल आणि मग आयपीएल. अशा परिस्थितीत तो म्हणाला की, आगामी टी -20 विश्वचषकासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करायचे आहे. तो काही दिवसांच्या विश्रांतीसाठी दुबईमध्ये असेल आणि त्यानंतर त्याचा संघ वेस्ट इंडिजसाठी टी -20 विश्वचषकाची तयारी करेल


गेलने आपल्या निर्णयाबद्दल सांगितले की, "गेल्या काही महिन्यांत मी वेस्ट इंडिज, कॅरिबियन प्रीमियर लीग आणि नंतर आयपीएलच्या बायो-बबलचा एक भाग आहे आणि मला स्वतःला मानसिक रीफ्रेश करायचे आहे. मला टी -20 विश्वचषकात वेस्ट इंडिजला मदत करण्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करायचे आहे आणि दुबईमध्ये विश्रांती घ्यायची आहे. मला वेळ दिल्याबद्दल पंजाब किंग्जचे आभार. माझ्या शुभेच्छा आणि आशा नेहमीच संघासोबत असतात. आगामी सामन्यांसाठी संघाला शुभेच्छा"



आयपीएलच्या 14 व्या आवृत्तीत, जिथे पंजाब किंग्स काही विशेष करू शकले नाहीत. त्याचवेळी, ख्रिस गेलची बॅटही जास्त चालली नाही. 42 वर्षीय खेळाडूने या हंगामात आतापर्यंत 10 सामन्यांत आपल्या बॅटसह केवळ 193 धावांचे योगदान दिले आहे. ज्यामध्ये 46 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.


दुसऱ्या लीगबद्दल बोलायचे तर युनिव्हर्स बॉसने आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये फक्त 15 धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जसाठीही हा हंगाम काही खास राहिला नाही. संघाने 11 पैकी 7 सामने गमावले आहेत आणि फक्त 4 वेळा विजय मिळवला आहे. प्रीती झिंटाचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत 6 व्या स्थानावर आहे.