IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. शेवटच्या दोन चेंडूत 10 धावांची गरज असताना रवींद्र जाडेजाने एक षटकार आणि चौकार खेचत गुजरातच्या (Gujarat Giants) तोंडचा घास हिरावून घेतला. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाने थैमान घातलेल्या निराश केलेल्या क्रिकेट चाहत्यांचं या थरारक सामन्याने मात्र पुरतं मनोरंजन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईने टॉस जिंकल्यानंतर गुजरातला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली होती. गुजरातने प्रथम फलंदाजी करत 214 धावांचा डोंगर उभा केला होता. पण चेन्नईच्या फलंदाजीला सुरुवात होताच पावसाने व्यत्यय आणला. पाऊस थांबल्यानंतर अखेर रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी पुन्हा सामना सुरु करण्यात आला. यावेळी चेन्नईसमोर 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं. 


चेन्नईने सुरुवात चांगली केली होती. पण नंतर विकेट्स गेल्यानंतर सामना पुन्हा गुजरातच्या बाजूने झुकला होता. पण अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू यांनी चेन्नईच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण अखेरच्या षटकांमध्ये मोहित शर्माने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीमुळे गुजरातचा विजय होणार असं दिसत होतं. सामना अखेर 2 चेंडूवर 10 धावांपर्यंत आला होता. यावेळी जाडेजाने आधी षटकार आणि नंतर चौकार लगावत गुजराच्या अक्षरश: तोंडून घास हिरावून घेतला. 



सामना संपल्यानंतर रवींद्र जाडेजाने धोनीला समर्पित करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामला शेअर केली आहे. या पोस्टमध्ये रवींद्र जाडेजाने धोनीसोबत हातात ट्रॉफी घेतलेला फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "एकमेव धोनीसाठी आम्ही करुन दाखवलं. माही भाई तुझ्यासाठी कायपण".


दरम्यान चेन्नईच्या विजयानंतर रवींद्र जाडेजाने 41 वर्षीय धोनीचं कौतुक केलं आहे. "चेन्नईच्या चाहत्यांचे खूप अभिनंदन. हा विजय आमच्या संघातील एका खास सदस्याला  एमएस धोनीला समर्पित करू इच्छितो," असं जाडेजाने सामन्यानंतर सांगितले.


दरम्यान रवींद्र जाडेजाने यावेळी मोहित शर्माच्या गोलंदाजीचा सामना करताना त्याच्या डोक्यात नेमकं काय सुरु होतं हेदेखील सांगितलं. गुजरातकडून मोहित शर्माने तीन गडी बाद केले. “मी फक्त विचार करत होतो की काहीही झाले तरी मला जोरात स्विंग करावे लागेल. होय, काहीही होऊ शकत होतं. मी समोर मारणार होतो कारण मोहित धीमी गोलंदाजी करू शकतो. मी CSK च्या सर्व चाहत्यांचं अभिनंदन करू इच्छितो," अशा भावना रवींद्र जाडेजाने व्यक्त केल्या.