IPLमुळे भारताला मिळाला आतापर्यंतचा सर्वात वेगवान गोलंदाज!
आयपीएल 2021 स्पर्धेतून भारताला आतापर्यंतचा सर्वात वेगवान गोलंदाज मिळाला आहे.
दुबई : आयपीएल 2021 स्पर्धेतून भारताला आतापर्यंतचा सर्वात वेगवान गोलंदाज मिळाला आहे. जो 153 Kmph वेगाने गोलंदाजी करतो. भारताने एक नवीन वेगवान गोलंदाज शोधला आहे, जो त्याच्या उत्तम गोलंदाजीने फलंदाजांमध्ये दहशत निर्माण करतोय.
सनरायझर्स हैदराबादचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाज उमरान मलिक बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळलेल्या आयपीएल सामन्यात आपल्या वेगवान गोलंदाजीचं कौशल्य दाखवत होता. उमरान मलिकने आरसीबीचा यष्टीरक्षक केएस भरतला बाद करत त्याची पहिली विकेट मिळवली.
भारताला मिळाला सर्वात वेगवाग गोलंदाज
जम्मूच्या या मुलाने दाखवलेला वेगाने सोशल मीडियावर सर्वांची मन जिंकली. आरसीबीच्या डावात 9व्या ओव्हरमध्ये, मलिकने 150 kmph किंवा त्याहून अधिक वेगाने सलग पाच बॉल टाकले. या दरम्यान, मलिकने या चौथा बॉल 153 kmph वेगाने टाकून सोशल मीडियावर बरीच वाहवा मिळाली.
गोलंदाजीने फलंदाजांच्या मनात दहशत
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या डावादरम्यान, उमरान मलिकने त्याच्या पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल 147 kmph वेगाने टाकला. या ओव्हरचा चौथा बॉल उमरान मलिकने 152.95 kmph वेगाने टाकला. जो या आयपीएल हंगामातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान बॉल आहे. उमरान मलिकने कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला मागे टाकलं आहे. ज्याने या आयपीएल हंगामात 152.75 च्या वेगाने चेंडू टाकला होता.
जम्मू काश्मिरसाठी घरच्या मैदानावर खेळतो उमरान
जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवसारखे गोलंदाजही या वेगाने गोलंदाजी करण्यात उमरान मलिकच्या मागे आहेत. उमरान मलिकचा जन्म 22 नोव्हेंबर 1999 रोजी श्रीनगरमध्ये झालाय. उमरान मलिक जम्मू -काश्मीरसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. उमरानने आपल्या राज्यासाठी यावर्षी जानेवारीत पहिला टी -20 सामना खेळला. त्या सामन्यात उमरानने 24 रन्स देत 3 विकेट्स घेतले.