IPL Points Table : मोठ्या विजयानंतर दिल्ली कॅपिटल्सची पाईंट्स टेबलमध्ये `मारुती उडी`, गुजरात कितव्या स्थानावर?
IPL Points Table Scenario : खलिल अन् मुकेश यांच्या सटीक गोलंदाजीच्या जोरावर आणि ऋषभ पंतच्या स्मार्ट कॅप्टन्सीच्या जोरावर दिल्लीने गुजरातचा पाणी पाजलं. त्यानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालाय.
Delhi Capitals Playoffs Scenario : आयपीएलच्या 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव केला. गुजरातने दिल्लीला विजयासाठी 90 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातला 20 ओव्हरमध्ये केवळ 89 धावा करता आल्या होत्या. दिल्लीने गुजरातने दिलेलं आव्हान 4 विकेट्स गमावून 8.5 ओव्हरमध्ये 67 बॉलआधी पूर्ण केलं अन् मोठा विजय मिळवला. तब्बल 67 बॉल राखून सामना जिंकल्याने दिल्लीने मोठी झेप (IPL Points Table) घेतली आहे. आजच्या सामन्याआधी दिल्लीकडे फक्त 4 गुण होते. तर दिल्लीचा नेट रनरेट -0.975 होता. आता दिल्लीकडे 2 गुण वाढले असून त्यांचा नेट रनरेट आता -0.074 झालाय. त्यामुळे आता दिल्लीने प्लेऑफच्या (Delhi Capitals Playoffs Scenario) दिशेने मार्गस्त झाल्याचं पहायला मिळतंय.
राजस्थान रॉयल्स मोठ्या विजयानंतर अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. आरआरकडे 12 गुण झाले असून आता प्लेऑफचं गणित अगदी सोपं झालंय. तर दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स असून त्यांच्या खात्यात 8 गुण आहेत. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्ज देखील 8 अंक अन् 0.726 नेट रननेटसह टॉप 4 मध्ये आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सनरायझर्स हैदराबादचा संघ मोठ्या विजयानंतर देखील +0.502 नेट रनरेटसह 8 अंक खात्यात जमा केले आहेत.
पाईंट्स टेबलमध्ये, लखनऊ सुपर जाएन्ट्सचा संघ 6 अंकासह 5 व्या स्थानी आहे. तर सहाव्या क्रमांकावर दिल्लीने झेप घेतली आहे. दिल्लीकडे आता 6 गुण असून नेट रनरेटमध्ये देखील मोठा बदल झाला आहे. दिल्लीचा नेट रनरेट -0.074 आहे. तर मोठ्या पराभवानंतर गुजरातला मोठा धक्का बसलाय. गुजरात नेट रनरेट -1.303 झालाय. तर त्यांच्याकडे 6 गुण आहेत. आठव्या क्रमांकावर पंजाब किंग्ज असून त्यांच्याकडे 4 गुण आहेत. त्यांचा नेट रनरेट -0.234 आहे. तर मुंबई आणि बंगळुरू अनुक्रमे 9 आणि 10 व्या स्थानावर आहेत.
दिल्लीसाठी प्लेऑफचं गणित सोपं (Delhi Capitals Playoffs Scenario)
दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतच्या नेतृत्वात 7 सामने खेळले आहेत. त्यांचे अजून 7 सामने बाकी आहेत. दिल्लीचे आगामी सामने हैदराबाद, गुजरात, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, आरसीबी आणि लखनऊसोबत असणार आहे. त्यातील हैदराबाद, कोलकाता आणि राजस्थानचा सामना दिल्लीला जड जाऊ शकतो. त्यामुळे आता दिल्लीला प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर उर्वरित 7 पैकी 5 सामने जिंकावे लागणार आहेत.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग ईलेव्हन) : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि खलील अहमद.
गुजरात टायटन्स (प्लेईंग ईलेव्हन) : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन आणि संदीप वॉरियर.