CSK vs KKR, IPL 2024 : कोलकाताने दिलेल्या 138 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना चेन्नई संघाने अवघ्या 17.4 ओव्हरमध्ये 3 गडी गमावून सामना जिंकला. संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने 58 चेंडूत 67 धावांची नाबाद खेळी केली. तर डॅरेल मिशेलने 25 आणि रचिन रवींद्रने 15 धावा केल्या. केकेआरकडून वैभव अरोराने 2 आणि सुनील नरेनने 1 बळी घेतला. हळूवार खेळपट्टीवर चेन्नईच्या गोलंदाजांकडून धारदार गोलंदाजी पहायला मिळाली. चेन्नई संघाकडून फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाने 18 धावा आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने 33 धावा देत प्रत्येकी 3 बळी घेतले. तर मुस्तफिजुर रहमानला 2 आणि महिष तिक्षीनाला 1 विकेट मिळाली. चेन्नईच्या विजयानंतर पाईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table Scenario) नेमके काय बदल झालेत? नजर टाकूया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्स अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. राजस्थानच्या खात्यात 8 गुण आहेत. तर पराभवानंतरही कोलकाता नाईट रायडर्स 6 गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. कोलकाता नेट रनरेट मात्र घसरल्याचं पहायला मिळतंय. कोलकाताचा नेट रनरेट 1.528 झालाय. तिसऱ्या स्थानावर लखनऊचा संघ असून त्यांच्या खात्यात देखील 6 गुण आहेत. लखनऊचा नेट रनरेट 0.775 आहे. तर कोलकाताचा पराभव करून दोन अंक जोडलेल्या चेन्नईच्या पदरी निराशाच आली आहे. चेन्नईला दोन गुण मिळाले खरे पण त्यांना पाईंट्स टेबलमध्ये पायरी चढता आली नाही. चेन्नईचा नेट रनरेट 0.666 झाला आहे. तर पाचव्या स्थानी हैदराबादचा संघ 4 अंक खात्यात घेऊन आहे.


पाईंट्स टेबलच्या खालच्या फळीवर लक्ष दिलं तर,  पंजाब किंग्ज 4 सामन्यात 4 गुणांसह -0.220 नेट रनरेटवर आहे. तसेच गुजरात जाएन्ट्स अंकतालिकेत 7 व्या स्थानी आहे. पहिल्या विजयानंतर आता मुंबई इंडियन्स तळ सोडला असून मुंबईची टीम 8 व्या स्थानी आलीये. तर आरसीबीला सुर आवळल्याने आता आरसीबी 5 सामन्यातील 2 अंकासह 9 व्या स्थानी आहे. त्याचबरोबर दिल्लीची देखील तीच अवस्था पहायला मिळतेय. दिल्लीला 5 सामन्यात केवळ 1 विजय मिळवता आलाय. त्यात दिल्ली -1.370 नेट रनरेटसह 10 व्या स्थानावर आहे.



कोलकाताची प्लेइंग इलेव्हन - फिलिप सॉल्ट (W), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (C), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.


चेन्नईची  प्लेइंग इलेव्हन -  ऋतुराज गायकवाड (C), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना.