अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (IPL 2022 Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर (RCB vs RR) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 158 धावांचं आव्हान राजस्थानने 11 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह राजस्थानने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तर आरसीबीचं आयपीएल जिंकण्याच स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलं. (ipl qualifier 2 rcb vs rr rajsthan royals beat royal challengers banglore by 7 wickets and enitire in final jos buttler)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉस बटलर राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. बटलरने 60 बॉलमध्ये 106 धावांची नाबाद खेळी केली. बटलरचं या मोसमातील हे चौथं शतक ठरलं. बटलर व्यतिरिक्त यशस्वी जयस्वालने 21 आणि कॅप्टन संजू सॅमसनने 23 धावांचं योगदान दिलं. आरसीबीकडून जोश हेझलवूडने 2 आणि वानिंदू हसरंगाने 1 विकेट घेतली. 


दरम्यान आरसीबीचा पराभव झाल्याने त्यांचा पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलंय. तर आता ट्रॉफीसाठी राजस्थान विरुद्ध गुजरात यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा अंतिम सामना रविवारी 9 मे ला खेळवण्यात येणार आहे. 


त्यामुळे आता आपल्या पहिल्याच मोसमात गुजरात चॅम्पियन होणार की राजस्थान दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकत आपला माजी कर्णधार शेन वॉर्नला आदरांजली वाहणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.


राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कॅप्टन-विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि ओबेड मॅकॉय.   


आरसीबीचे अंतिम 11 खेळाडू : फाफ डुप्लेसी (कर्णधार) विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरुर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदु हसारंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जॉश हेजलवुड.