मुंबई  : भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. यामुळे जगातले कित्येक व्यवहार ठप्प झाले. क्रीडा जगतालाही याचा फटका बसला होता. मात्र आता आयपीएलला सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट संघाला युएई प्रवासाची परवानगी दिली आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. परंतु स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या वेळापत्रकानुसार अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. हे सर्व सामने रात्री सात वाजता सुरू होणार आहेत. रविवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या  'व्हर्च्युअल' बैठकीत निर्णय घेण्यात आला.  याआधी आयपीएलचा अंतिम सामना ८ नोव्हेंबर रोजी रंगणार होता. 


शिवाय सध्याच्या हंगामासाठी VIVO हीच कंपनी स्पर्धेची मुख्य स्पॉन्सर राहणार असल्याचा निर्णय निश्चीत करण्यात आला आहे. अखेर यंदाच्या वर्षीच IPL 2020 चा संग्राम पार पडणार असून, याच्या अधिकृत तारखांचीही घोषणा करण्यात आली आहे.