IPL2021 CSK vs RCB : टीम इंडियाचा माजी कर्णधार विरुद्ध आजी कर्णधार आज मैदानात भिडणार
आतापर्यंत एकही सामना बंगळुरू संघाने गमवलेला नाही. तर चेन्नई संघाने तीन सामने जिंकले आहेत. चेन्नईचा कर्णधार बंगळुरूच्या विजयाच्या स्वप्नांना सुरूंग लावणार?
मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्या IPLमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार असलेल्या थाला अर्थात महेंद्र सिंह धोनी विरुद्ध आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना होणार आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार विरुद्ध आजी कर्णधार आज मैदानात भिडणार आहेत. या सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.
पॉइंट टेबलमध्ये सलग चार सामने जिंकलेल्या कोहलीच्या संघाला पाचवा सामना जिंकण्यात यश मिळणार की चेन्नई सुपरकिंग्सचा थाला या घोडदौडीला ब्रेक लावणार हे पाहाणं सर्वांसाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.
आतापर्यंत एकही सामना बंगळुरू संघाने गमवलेला नाही. तर चेन्नई संघाने तीन सामने जिंकले आहेत. चेन्नईचा कर्णधार बंगळुरूच्या विजयाच्या स्वप्नांना सुरूंग लावणार का हे आज दुपारी 3.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळणार आहे.
हेड टू हेड सामने काय सांगतात
आतापर्यंत IPLच्या इतिहासात महेंद्रसिंह धोनीचा CSK संघ विरुद्ध कोहलीचा RCB संघ 27 सामने खेळले आहेत. त्यापैकी चेन्नईने तब्बल 17 सामने जिंकले आहेत. तर 9 सामने रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू संघ जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात बाजी कोण मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
चेन्नई सुप किंग्स- महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायडू, के एम आसिफ, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फाफ डु प्लेसिस, इमरान ताहिर, एन जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एनगिडी, मिशेल सेंटनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करन, आर साई किशोर, मोईन अली, के गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, सी हरी निशांत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, एडम जाम्पा, देवदत्त पडिक्कल, केन रिचर्ड्सन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, शाहबाज अहमद, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, काइल जेमिसन, डॅनियल क्रिश्चियन, सुयश प्रभुदेसाई, केएस भरत, फिन एलन.