मुंबई: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात 3 विकेट्सने राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला आहे. रोमांचक सामन्यात दिल्ली संघाच्या फलंदाजीदरम्यान ऋषभ पंत क्रिझवर होता. पंतला खेळताना रन आऊट करत राजस्थान रॉयल्सनं आनंद साजरा केला. राजस्थान रॉयल्स संघातील एका खेळाडूनं तर चक्क मैदानात डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतची शानदार फलंदाजी सुरू होती. मात्र पंतने 13 व्या ओव्हरमध्ये चौथा बॉल मारल्यानंतर धावा काढण्यासाठी जात असताना रियान परागनं त्याला रनआऊट केलं. पंत आऊट होताच पुन्हा एकदा मैदानातच बिहू डान्स सुरू केला. 



दिल्ली कॅपिटल्स संघाने राजस्थान समोर 148 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. डेव्हिड मिलरने राजस्थानच्या संघाची सामन्यावर पकड मजबूत केली. मात्र तो आऊट झाल्यानंतर सगळंच डळमळलं. पण क्रिस मॉरिसनं कमाल केली. 18 चेंडूमध्ये 36 धावा काढून राजस्थान संघाला त्याने विजय मिळवून दिला. त्याने 4 चौकारही ठोकले. 


राजस्थानच्या गोलंदाजांनी कमाल कामगिरी केली. वानखेडे स्टेडियमवर दिल्ली संघाला धावा काढण्याची संधी फार कमी मिळू दिल्यानं 147 धावा 20 ओव्हरमध्ये काढल्या गेल्या. जयदेव उनादकटने दमदार कामगिरी करत 4 ओव्हरमध्ये 15 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.