दुबई : आयपीएल 2021 चा महत्त्वाचा सामना केन विल्यमसनचा संघ सनरायझर्स हैदराबाद आणि रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स यांच्यात थोड्या वेळाने खेळला जाईल. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सला प्लेऑफला पोहोचण्यासाठी टॉस जिंकणे महत्वाचे होते, कारण मुंबईसाठी आज Do or Die अशी परिस्थिती ओढावली आहे. तसे पाहाता मुंबई टीमने टॉस जिंकूण पहिला टप्पा तर पार केला आहे परंतु त्यांची खरी अग्निपरीक्षा तर पुढे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकल्याने चाहत्यांच्या मनात मॅच जिंकण्याच्या इच्छा प्रबळ होत चालल्या आहेत, परंतु पुढील टप्पे पार करणे मुंबईसाठी महत्वाचे आहे. ते दोन टप्पे जर मुंबईने पार केलं तर जे आयपीएलच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं काहीसं आपल्याला पाहायला मिळेल.




टॉस जिंकल्यानंतर मॅच जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सला काय करावं लागेल?


प्ले ऑफ समीकरमाचा विचार करता, टीमला फलंदाजीत 200 पेक्षा अधीक धावा कराव्या लागतील. कारण त्यापेक्षा कमी धावांना विचार करणे त्यांच्यासाठी शक्यच नाही. इतक्या धावा केल्यावर, त्यांच्या गोलंदाजांचा प्रयत्न असा असावा की, त्यांनी सनरायझर्सला इतक्या धावांवर ऑलआउट केले पाहिजे की दोन्ही संघांमधील विजयाचे अंतर किमान 171 धावा असावे. ही समीकरणे पूर्ण केल्यानंतरच मुंबई इंडियन्सचा संघ आज प्लेऑफसाठी पात्र होऊ शकेल. अन्यथा, कोलकाता नाईट रायडर्सला प्लेऑफ खेळण्याचा परवाना मिळेल.


त्यामुळे आता हा सामना कोणत्या दिशेने जातो आणि क्रिकेट प्रेमींसाठी तो किती रोमांचक ठरणार आहे हे पाहणं उत्सुकता वाढवणारं ठरेलं.