Sam Curran : शुक्रवारी कोची येथे पार पडलेल्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात एकूण 405 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या लिलावामध्ये आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी लागली लागली ती इंग्लंडचा स्टार खेळाडू सॅम करनवर (Sam Curran). शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने (punjab kings) सॅम करनला तब्बल 18.5 कोटी रुपये खर्च करून आपल्या संघात घेतले आहे. टी-20 वर्ल्ड कपस्पर्धेत मालिकावीर ठरत अंतिम सामन्यात सॅम करनने सामनावीर होण्याचा मानही मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

18 कोटी 50 लाखांची बोली


पंजाब किंग्ज व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनीही सॅम करनवर बोली लावली होती. मात्र शेवटी सॅम करनला त्याच्या आधीच्याच संघाने विकत घेतले. सॅम करनने पंजाब किंग्जमधूनच आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यानंतर आता पंजाबने सॅम करनला 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलं आहे.


मला या रकमेची अपेक्षा नव्हती - सॅम करन


स्टार स्पोर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये, लिलावात मला एवढी मोठी रक्कम मिळेल मला याची अपेक्षा नव्हती, सॅम करनने म्हटलं आहे. "मी काल रात्री जास्त झोपू शकलो नाही, थोडा उत्साही होतो, लिलाव कसा होईल याबद्दल घाबरलो होतो. पण मला या रकमेत विकत घेतल्याचा खूप आनंद झाला. मला या रकमेची अपेक्षा नव्हती," असे सॅम करन म्हणाला.


सॅम करनसोबत त्याची 24 वर्षीय गर्लफ्रेंड इसाबेला सायमंड्स विल्मोट (Isabella Symonds-Willmott) ही चर्चेत आली आहे. गेल्या तीन वर्षांपासू सॅम करन आणि इसाबेला हे एकत्र आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्या फोटोंची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. शुक्रवारी पार पडलेला आयपीएलचा लिलाव सॅम आणि इसाबेला यांनी एकत्र पाहिला होता. लिलावानंतर सॅम करनने याचा खुलासा केला.


कोण आहे इसाबेला सायमंड्स विल्मोट?


इसाबेलाने 2019 मध्ये इंग्लंडच्या एक्सेटर विद्यापीठात शिक्षण घेतले आहे आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत मिळून काम करत आहे. दोघांची पहिली भेट एका कार्यक्रमात झाली आणि त्यानंतर ते अनेकदा सोशल मीडिया आणि चॅटच्या माध्यमातून बोलू लागले. सॅम करणची गर्लफ्रेंड सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. अनेकदा इसाबेला तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते. इसाबेला प्राण्यांवर होणारी कोणत्याही प्रकारची क्रूरता थांबवण्यासाठी प्रयत्न करत असते.