Ireland beat Pakistan by 5 wickets : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी आयर्लंड आणि पाकिस्तान (Pakistan vs Ireland) यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मात्र, आयर्लंडने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला आरसा दाखवलाय. पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात आयर्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. पाकिस्तानने आयर्लंडसमोर 183 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, आयर्लंडने अखेरच्या ओव्हरमध्ये बाजी मारली अन् पाकिस्तानला पराभवाचा झटका दिला. वर्ल्ड कपपूर्वी आयर्लंडकडून पराभूत झाल्याने आता क्रिडाविश्वास पाकिस्तान संघाने हसू करून घेतलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट संघाने बाबर आझमच्या अर्धशतकाच्या जोरावर 182 धावांचे लक्ष्य ठेवले होते. बाबरशिवाय सैम अयुबने 45 तर इफ्तिखार अहमदने 37 धावा केल्या. अशा प्रकारे पाकिस्तान संघाने 20 षटकात 6 विकेट गमावून 182 धावा केल्या. आयर्लंडचा सलामीचा फलंदाज अँड्र्यू बालबर्नीने ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. परिणामी आयर्लंडने ५ विकेट्सने मोठा विजय नोंदवला. आता पाकिस्तानचा संघ 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. 



टी-20 विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा सामना 9 जून रोजी होणार आहे. याआधी पाकिस्तानची ही अवस्था म्हणजे भारतासाठी गुड न्यूज म्हणावी लागेल. मात्र, पाकिस्तानने अद्याप संघ जाहीर केला नाही. पाकिस्तान लवकर वर्ल्ड कपसाठी टी-ट्वेंटी संघ जाहीर करेल. बाबर आझम याच्या खांद्यावर कॅप्टन्सी सोपवली जाऊ शकते.



आयर्लंडची प्लेइंग इलेव्हन - पॉल स्टर्लिंग (C), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (WK), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, बेंजामिन व्हाइट.


पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन - मोहम्मद रिझवान, सॅम अयुब, बाबर आझम (C), फखर जमान, शादाब खान, आझम खान (WK), इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अब्बास आफ्रिदी.


आयसीसी टी-20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड टीम - पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबिर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोशुआ लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.