इंग्लंडला 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये घाम फोडणाऱ्या स्टार खेळाडूचा वनडे क्रिकेटला रामराम
वनडेला रामराम ठोकल्यानंतर हा खेळाडू आपला वेळ कसोटी आणि टी 20 क्रिकेटला देणार आहे.
मुंबई : आयर्लंडचा (Ireland) स्टार ऑलराऊंडर खेळाडू केव्हीन ओ ब्रायनने (Kevin O’Brien) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आयर्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वनडेला रामराम ठोकल्यानंतर केव्हीन आपला वेळ कसोटी आणि टी 20 क्रिकेटला देणार आहे. केव्हीन आयर्लंडच्या स्टार खेळाडूंपैकी एक खेळाडू होता. (Ireland star batsman Kevin O’Brien has announced his retirement from ODI cricket)
केव्हीनने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध केलेली वेगवान शतकी खेळी प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या लक्षात आहे. इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात केव्हीनने वेगवान शतक ठोकण्याची कामगिरी केली होती. विशेष म्हणजे विजयी आव्हानाचं पाठलाग करताना केव्हीनने हे शतक 50 चेंडूत झळकावलं होतं.
त्याच्या या खेळीच्या जोरावर आयर्लंडने इंग्लंडचा पराभव केला होता. या सामन्यानंतर केव्हीनला नवी ओळख मिळाली. केव्हीनने एकूण 63 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 13 फोरच्या मदतीने 113 धावांची धमाकेदार खेळी केली होती. विशेष म्हणजे केव्हीनने सहाव्या क्रमांकावर येत ही धमाकेदार खेळी केली होती.
केव्हीनची एकदिवसीय कारकिर्द
केव्हीनने 152 वनडे सामन्यांमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 88.79 च्या स्ट्राईक रेट आणि 29.42 सरासरीने 2 शतक आणि 18 अर्धशतकांच्या मदतीने 3 हजार 619 धावा केल्या आहेत. 142 ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. तसेच त्याने 116 विकेट्स घेण्याचा करिष्माही केला आहे. एका सामन्यात 13 धावा देऊन 4 विकेट्स ही केव्हीनची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे.
संबंधित बातम्या :
WTC Final 2021 | पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला दिवसाचा खेळ वाया
मुंबईचा न्यूझीलंडकडून खेळणारा बॉलर विराटसेनेसाठी ठरणार डोकेदुखी