जिंकलास भावा | विकेटकीपरचा मनाचा मोठेपणा, बॅट्समनला दिलं जीवनदान, पाहा व्हीडिओ
क्रिकेटला `जेंटलमॅन गेम` म्हटलं जातं. पण हल्ली एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, जाणीवपूर्वक इजा होईल या हेतून फलंदाजाच्या अंगावर बॉल फेकणं आणि स्लेजिंग यासारखे प्रकार सामन्यादरम्यान आपण घडताना पाहतो.
मुंबई : क्रिकेटला 'जेंटलमॅन गेम' म्हटलं जातं. पण हल्ली एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, जाणीवपूर्वक इजा होईल या हेतून फलंदाजाच्या अंगावर बॉल फेकणं आणि स्लेजिंग यासारखे प्रकार सामन्यादरम्यान आपण घडताना पाहतो. मात्र असेही काही खेळाडू आहेत, जे अजूनही 'जेंटलमॅन गेम' ही क्रिकेटची ओळख जपत आहेत. एका विकेटकीपरने प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाजाला आऊट न करुन खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं. त्याच्या या कृतीचा व्हीडिओ आता सोशल व्हीडिओ व्हायरल होतोय. (ireland vs nepal 6 th match nepal wicket keepar asif sheikh show sportsman spirit at al amerat cricket ground)
नक्की काय घडलं?
आयर्लंड विरुद्ध नेपाळ यांच्यात 14 फेब्रुवारीला टी 20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात नेपाळचा विकेटकीपर बॅट्समन आसिफ शेखने (Nepal Wicket keepar Aasif Sheikh) असं काही केलं की ज्याने सर्वांचंच मन जिंकलं.
सामन्यातील 19 वी ओव्हर सुरु होती. आयर्लंडची बॅटिंग होती. मार्क अडायर आणि एंडी मॅकब्राईन ही जोडी बॅटिंग करत होती. त्याच ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर हा सर्व प्रकार घडला.
कमल सिंहने ओव्हरमधील तिसरा चेंडू टाकला. मार्कने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपक्षेप्रमाणे फार दूर गेला नाही. त्यामुळे या दोघांनी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नात एंडी नॉन स्ट्राईकवरुन स्ट्राईकच्या दिशेने धाव सुटला. या दरम्यान तो पीचच्या मध्येच पडला. तेव्हा गोलंदाजाही आपल्या जवळ आलेला चेंडू घ्यायला धावला आणि तो चेंडू विकेटकीपरच्या दिशेने फेकला.
या वेळेस मॅकब्राईन आणि गोलंदाज आपसात धडकले आणि मॅकब्राईन तिथेच खाली पडला. यानंतर बॉलर सावरत उठला आणि विकेटकीपरच्या दिशेने थ्रो केला.
तर दुसऱ्या बाजूला मॅकब्राईनने धडपडत उठत स्ट्राईक एंडच्या दिशने धावण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर उशिर झाला होता. हा घडलेला सर्व प्रकार विकेटकीपर स्टंपमागून पाहत होता.
बॉलर आणि बॅट्समन यांच्या दोघांना लागलेला धक्का त्याने पाहिला होता. विकेटकीपरने ठरवलं असतं तर त्याला मॅकब्राईनला आऊट करता आलं असंत. मात्र त्याने तसं केलं नाही. विकेटकीपर आसिफने मॅकला रनआऊट केलं नाही. आसिफने थ्रो कलेक्ट केला आणि फेकून दिला.
आसिफच्या या कृतीचं सोशल मीडियावर भरभरुन कौतुक होतंय. तसेच हा व्हीडिओ फार व्हायरल होतोय.
दरम्यान या सामन्यात आयर्लंडने नेपाळवर 16 धावांनी विजय मिळवला. टॉस जिंकत आयर्लंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 127 धावा केल्या. मात्र नेपाळला 20 ओव्हरमध्ये 111 धावाच करता आल्या. नेपाळचा जरी पराभव झाला असला, तरी आसिफच्या त्या कृतीचं भरभरुन कौतुक केलं जात आहे.