नवी दिल्ली : सध्या भारताचे क्रिकेटर इरफान पठाण आणि युसुफ पठाण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. हे दोघेही टीम इंडियाचा हिस्सा नसले तरी सोशल मीडियावर यांचीच चर्चा सुरु आहे. या दोघांच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही भावांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. ज्यावर कमेंट तसेच लाईक्सचा पाऊस पडतोय. तसेच अनेकांनी हा व्हिडीओ रिट्वीटही केलाय. 



 


सगळ्यात आधी ९ जुलैला युसुफ पठाणने छोटे मियाँ इरफानचा व्हिडीओ शेअर केलाय त्यासोबत असे म्हटलेय की, 'क्या सुर लगाए हैं छोटे मियां...'.


त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० जुलैला छोटे मियाँ इरफानने आपल्या मोठ्या भावाचा युसुफचा व्हिडीओ शेअर केलाय. यात त्याने म्हटलंय, 'वाह बड़े भाई क्या बात है....' या दोन्ही व्हिडीओजना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळतोय.