Jasprit Bumrah On Captaincy : तुझा फेवरेट कॅप्टन कोण? असा सवाल जेव्हा बुमराहला केला तेव्हा बुमराहने ना विराट ना रोहित नाही धोनीचं नाव घेतलं. त्याने स्वत:ला फेवरेट कॅप्टन म्हटलं आहे. मी आवडता कॅप्टन दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वत: आहे, असं बुमराह म्हणतो. मी काही सामन्यांसाठी कॅप्टन्सी केली आहे. त्यामुळे मी स्वत:चं नाव घेईल, असं बुमराह म्हणतो. खूप महान खेळाडू कॅप्टन आहेत. वेगवान गोलंदाज चांगले कर्णधार बनवू शकतात आणि त्यांना खेळ चांगल्या प्रकारे समजतो, असं जसप्रीत बुमराह म्हणाला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत बुमराहने हे वक्तव्य केलंय.


नेमकं काय म्हणाला जसप्रीत बुमराह?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी टीमकडे जाऊन असं म्हणू शकत नाही की मला कॅप्टन करा. माझ्या क्षमतेच्या वरची गोष्ट आहे ही.. मला वाटतं की बॉलर अधिक चतूर असतो, कारण आम्हाला फलंदाजाला बाद करायचं असतं. आम्ही प्रत्येकवेळी समस्यांना सामोरं जात असतोय. कधी मैदान बारकं असतं, तर कधी बॅट मजबूत असते. पण गोलंदाजांना नेहमी झुंजावं लागतं. ते बॅटच्या मागे लपून राहत नाहीत. त्यांना सपाट पिचची कारणं देता येत नाहीत. जेव्हा कधी सामना गमावतो, तेव्हा गोलंदाजांना जबाबदार धरलं जातं, त्यामुळे हे नक्कीच अवघड काम आहे, असं म्हणत बुमराहने आपल्या वेदना मांडल्या आहेत.


एक बॉलर म्हणून मला गर्व वाटतो. तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. कॅप्टन्सीसाठी चांगलं प्रदर्शन करण्याची गरज असते. मी वसीम अक्रमला गोलंदाजी करताना पाहिलं. कपिल देव आणि इमरान खान यांच्या कॅप्टन्सीखाली वर्ल्ड कप जिंकले आहेत, असं म्हणत बुमराहने सुचक वक्तव्य केलंय. 


दरम्यान, परिणामानुसार इच्छाशक्ती बदलतात. मला वाटत नव्हतं की, बॉलिंग अॅक्शन काम करेल. पण आता लोक याची नक्कल करतात. यावरून झालेला परिणाम दिसून येतो. तुम्ही मागे लपत नाही आणि बॅकबेंचर होण्याचा प्रयत्न करत नाही. माझी मानसिकता अशी असते की जर तुम्ही मला बॉल दिला तर मी फरक दाखवून देईल. मला वाटतं की जबाबदारीपेक्षा जास्त मोठा विचार असू शकत नाही, असं जसप्रीत बुमराहने म्हटलं आहे.